🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी कारखाना कर्मचाऱ्यांना सर्व थकीत पगार दिला आहे, याबद्दल कर्मचाऱ्यांनी आज गोपीनाथ गडावर त्यांची प्रत्यक्ष भेटून आभार मानले.
यावेळी कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखवत त्यांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्धार केला. दरम्यान, वैद्यनाथचे उपोषण हा राजकीय स्टंट असून वैद्यनाथच्या विरोधात काड्या करणारे विरोधक एकीकडे मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेण्याचे नाटक करतात आणि दुसरीकडे त्यांच्याच कारखान्यात विघ्न आणतात अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
वैद्यनाथ साखर कारखाना आर्थिक संकटात असुनही कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी कर्मचाऱ्यांना सर्व थकीत पगाराची रक्कम त्यांच्या बॅंक खात्यात जमा केली आहे. मुळात दोन महिन्यापूर्वी कारखान्यात बैठक झाली होती, कर्मचारी युनियनला पंकजाताई मुंडे यांनी सप्टेंबर अखेर पर्यंत आपले प्रश्न निकालात काढेल असा शब्द दिला होता, त्याप्रमाणे खात्यात रक्कम जमा झाल्यानंतर आता पैसे मिळणार हे स्पष्ट झाल्यावर उपोषणाला बसण्याचा घाट कारखान्यातील राष्ट्रवादी धार्जिण्या कर्मचाऱ्यांनी नेत्यांशी संगनमत करुन घातला.
यातील काही लोकांचे कारखान्याकडे देणे आहे, शिवाय बहुतेक लोक राष्ट्रवादीचे बुथ प्रमुख आहेत. सर्व कर्मचारी एकीकडे आणि 25-30 कर्मचारी उपोषणात असे चित्र होते. कारखान्यातील सर्व कर्मचा-यांनी आपले उपोषणाला समर्थन नाही असे लेखी दिले आहे तरीही काही जण राजकीय दबावापोटी उपोषणाला बसले असल्याचे त्या म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1176144201274122240?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1176127862086127616?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1176339357801709570?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
