Share

अब्दुल सत्तारांना रोखण्याचे भाजपपुढे आव्हान, ग्रामपंचायत सदस्यांचा पुन्हा शिवसेना प्रवेश

Published On: 

औरंगाबाद : काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेले अब्दुल सत्तार यांना रोखण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर निर्माण झाले आहे. सिल्लोड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह सदस्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेच प्रवेश केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील भाजपच्या वाढलेल्या वर्चस्वाला पुन्हा एकदा खीळ बसली आहे.

सिल्लोड तालुका भाजपला मागील १५ दिवसात दुसऱ्यांदा धक्का बसला आहे. तालुक्यातील भाजपच्या ताब्यातील ग्रामपंचायती मधील सरपंच, उपसरपंच व ग्रा.प.सदस्यांनी नुकतेच शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत पुन्हा प्रवेश सोहळा झाला. यामध्ये पंचायत समितीच्या विद्यमान सदस्या छाया उबाळे यांचे सासरे नामदेव म्हतारजी उबाळे, हळदा येथील माजी सरपंच अजय हळदेकर, कृष्णा जाधव, भगवान उबाळे, वसंता उबाळे, ओंकात उबाळे, सुनील जाधव, प्रकाश उबाळे, दिलीप उबाळे यांच्यासह भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांच्याहस्ते व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत सिल्लोड येथे आयोजित शिवसंपर्क मोहीम शुभारंभाच्या कार्यक्रमात हा प्रवेश सोहळा पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर या शिवसंपर्क अभियानाची सुरूवात करण्यात आली आहे. मात्र, यामध्येच भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश सत्र सुरू आहे. यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!