बीड: कोविडच्या या महामारीच्या काळात दिवस रात्र मेहनत करून अनेक रुग्णांचे प्राण वाचवणारे आपले कोविड योद्धा त्यांचे हे ऋण कदापि विसरू शकणार नाही, आशा शब्दांमध्ये भाजपच्या नेत्या व राष्ट्रीय सचिव पांकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या सेवा यज्ञात शहरातील डॉक्टर तसेच इतर सर्व आरोग्य कर्मचारी यांचा सेवाभाव खूप मोलाचा ठरला आहे असंही त्या यावेळी म्हणाल्या. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने सूक्ष्म लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांसाठी अक्षता मंगल कार्यालयात सुरू केलेल्या सेवा यज्ञाच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या.
अक्षता मंगल कार्यालयात सुरू केलेल्या सेवा यज्ञाच्या समारोपप्रसंगी पांकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी खासदार डॉ. प्रीतम मुंडे, भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इटके व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कोरोना रुग्णांसाठी सुरू केलेला सेवा यज्ञ सर्वाच्या सहकार्यातून यशस्वी झाला. सर्व डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे होते. प्रत्येक कार्यकर्त्यांनी एकजुटीने आणि नियोजनबद्ध रितीने काम केल्याने हे शक्य झाले, या सर्वांचेच ऋण मी व्यक्त करते. असेच काम भविष्यातही होईल असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.
खासदार डॉ. प्रीतम मुंडे तसेच सर्व डॉक्टर, आरोग्य व स्वच्छता कर्मचारी व भाजपचे सर्व कार्यकर्ते यांनी गेले महिनाभर जे अतोनात कष्ट घेतले त्याबद्दल खरच कौतूक वाटते असेही त्या म्हणाल्या. कोविडच्या या काळात देखील खा. प्रीतम मुंडे यांनी गावोगावी जाऊन तेथील रुग्णांची पाहणी केली तसेच अनेक कोविड केअर सेंटरला भेटी सुद्धा त्यांनी दिल्या आहेत. त्याच सोबत अत्यंत मोलाचे म्हणजे हे सर्व कोविड योद्धे ज्यांनी आपली घरं सोडून रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र झटत होते. याच पार्श्वभूमीवर यावेळी येथील सर्व डॉक्टरांचा सन्मानपत्र देऊन करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ही तर सुरुवात आहे, शेवट काय आहे तो नंतर सांगू’, आ.मेटेंचा इशारा
- उद्धवा, अजब तुझे सरकार! कामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्याला मारहाण तर विनापरवानगी आ.मेटेंच्या मोर्चाला पोलिसांचे सरंक्षण
- आ.मेटेंची ग्वाही फक्त नावालाच, मोर्चाच्या सुरुवातीलाच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
- ‘गंगेतील मृतदेहांची चर्चा झाली, पण बीडच्या २२ मृतदेहांच्या विटंबनेवर शांत का?’
- ‘पोलिसांनी कायदा, सुव्यवस्था ढासळणार नाही याकडे लक्ष द्यावे’, बंदी असतानाही मोर्चा काढणाऱ्या आ.मेटेंचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

