Share

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा, डीएपी खतांच्या अनुदानात आणखी वाढ

Published On: 

नवी दिल्ली : खरिपाच्या हंगामात रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीवरून शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असताना, केंद्र सरकारने बळीराजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. डीएपी (डाय अमोनियम फॉस्फेट) खतांवरील अनुदान आणखी ७०० रुपयांनी वाढविण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना डीएपी खताची २४०० रुपयांची एक गोणी १२०० रुपयांना, म्हणजेच जुन्याच दरात मिळणार आहे. यामुळे सरकारी तिजोरीवर १४,७७५ कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षेखाली गत महिन्यात झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना जुन्याच दराने खत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी डीएपी खतांच्या अनुदानात १४० टक्क्यांची वाढ करण्याची घोषणा मोदींनी केली होती. त्यानुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अनुदानाची रक्कम वाढवण्याला मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय रसायन आणि खते राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी दिली.

डीएपीच्या खतांमध्ये एकणून १२०० रुपये अनुदान
देशातील शेतकऱ्यांकडून युरियानंतर खतांमध्ये डीएपीचा सर्वाधिक वापर केला जातो. उल्लेखनीय बाब म्हणजे, गतवर्षी डीएपी खताचे दर प्रति गोणी १७०० रुपये इतके होते. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या ५०० रुपयांच्या अनुदानामुळे शेतकऱ्यांना ती १२०० रुपयांना मिळत होती. पण आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या किमतीमुळे या खतांच्या गोणीची किंमत यंदा तब्बल २४०० रुपयांवर पोहोचली. देशातील कोरोना संकट आणि शेतकऱ्यांकडून होत असलेला विरोध लक्षात घेत, सरकारने ५०० रुपयांवरील अनुदानात आणखी ७०० रुपयांची वाढ केल्याने एकूण अनुदान १२०० रुपये झाले आहे.

युरियावर ९०० रुपयांचे अनुदान
या वाढीव अनुदानामुळे शेतकऱ्यांना दरवाढीपूर्वीच्या जुन्याच दरात म्हणजे १२०० रुपये किमतीने ५० किलोची खतांची गोणी मिळणार आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. सरकारकडून डीएपीसह इतर खतांवर एक निश्चित रक्कम अनुदान स्वरूपात दिली जाते. युरियावर सरासरी प्रति गोणी ९०० रुपयांचे अनुदान सरकारकडून दिले जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!