मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत. यानंतर, कोल्हापुरातील वातावरण तापलं असून सोमय्या यांना २० सप्टेंबर रोजी कोल्हापूरला न जाताच माघारी फिरायला लागलं होतं. मुश्रीफ यांच्यावर सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील नेत्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
आता सोमय्या हे उद्या म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी कोल्हापूरला जाणार आहेत. मुश्रीफ यांनी देखील सोमय्या यांना कोल्हापुरात येऊ द्यावं असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे. दरम्यान, सोमय्या हे आज मुंबईहून निघणार आहेत. याआधी त्यांनी मुश्रीफ यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधलाय.
‘हसन मुश्रीफ मला या ना त्या प्रकारे थांबवण्याचा प्रयत्न करणार. उद्या मुश्रीफ यांच्या तिसऱ्या आणि चौथ्या घोटाळ्याचीही तक्रार करणार आहे. शरद पवार यांच्याकडून यांनी केवळ लुटा हेच शिकलं आहे. मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना आव्हान देतो की हिम्मत असेल तर मला थांबवा. पोलिसांचा गुंडांसारखा वापर केला. आता ते थांबवू शकणार नाहीत. हसन मुश्रीफ यांना तुरुंगात जाण्यापासून कुणीही थांबवू शकणार नाहीत. हसन मुश्रीफ यांना कुणीही वाचवू शकणार नाही,’ असा दावा सोमय्या यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- भरतीत घोटाळ्याच्या प्रकाश शेंडगेंच्या आरोपात 100 टक्के तथ्य- प्रविण दरेकर
- ‘ऊसतोड कामगार हा राजकारणाचा विषय नव्हेच, श्रेयासाठी मी काम केले नाही!’, पंकजांचा धनंजय मुंडेंना अप्रत्यक्ष टोला
- राज्यसभा पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या रजनी पाटील यांचे चंद्रकांतदादांनी केले अभिनंदन
- ‘अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या अवमानाची…’, मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांचे खळबळजनक वक्तव्य
- वयाच्या 40 व्या वर्षी ‘थाला’ची कमाल सुरूच; केला ‘हा’ मोठा विक्रम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

