Share

वयाच्या 40 व्या वर्षी ‘थाला’ची कमाल सुरूच; केला ‘हा’ मोठा विक्रम

Published On: 

🕒 1 min read

अबुधाबी : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने रविवारी आयपीएल 2021 च्या 38 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध दोन झेल घेतले. एमएस धोनीने सामन्यात व्यंकटेश अय्यर आणि दिनेश कार्तिकचे झेल पकडले आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक झेल घेणारा यष्टीरक्षक बनला. एमएस धोनीने दिनेश कार्तिकचा झेल घेत ही कामगिरी केली. मोठी गोष्ट म्हणजे धोनीने दिनेश कार्तिकलाच मागे टाकत हा विक्रम केला आहे.

एमएस धोनीने आयपीएलमध्ये यष्टीरक्षक म्हणून 116 झेल, तर दिनेश कार्तिकने 115 झेल घेतले. दिनेश कार्तिकला धोनीशी बरोबरी करण्याची किंवा दुसऱ्या डावात त्याला मागे सोडण्याची संधी होती, पण दुर्दैवाने त्याला झेल मिळाला नाही. आयपीएलमध्ये सर्वाधिक स्टंपिंगचा विक्रमही एमएस धोनीच्या नावावर आहे. आयपीएलमध्ये यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या नावावरही धोनीच्या नावाची नोंद आहे. धोनीने आयपीएलमध्ये 155 विकेट्स घेतल्या आहेत, ज्यात 39 स्टम्पिंगचा समावेश आहे.

146 बळींसह दिनेश कार्तिक या प्रकरणात दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दोघांशिवाय आयपीएलच्या इतिहासात असा एकही यष्टीरक्षक नाही ज्याने 100 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या असतील. रॉबिन उथप्पा या यादीत 900 बळींसह तिसऱ्या स्थानावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!