Share

दसऱ्या मेळाव्यात पंकजा मुंडे करणार अमित शहांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरवात झाली आहे. आता प्रत्येक उमेदवाराने आपल्या मतदारसंघात सक्रीय होऊन प्रचाराचा धडका लावला आहे. बीडमध्ये ही भाजप नेत्या पंकजा मुंडे या आपल्या परळी मतदारसंघातून घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. तर दसऱ्यानिमित्त पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील सावरगाव इथं मेळावा आयोजित केला आहे. विशेष म्हणजे या मेळाव्याला भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच विधानसभेसाठी अमित शहा राज्यात 20 सभा घेणार असल्याच सांगण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पंकजा मुंडे यांचा हा दसरा मेळवा लक्षवेधी ठरणार आहे. या मेळाव्यातून पंकजा मुंडे मतदारसंघाला कशा संबोधित करतात हे पाहणे औत्सुक्याच ठरणार आहे. परळी विधानसभा मतदारसंघात गेल्या वेळेस प्रमाणे याही वेळेसही भावा बहिणीत चुरस पाहिला मिळणार आहे. कारण पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे महाराष्ट्रातील २ बडे नेते विधानसभा निवडणुकीला आमने सामने असणार आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी परळी मतदार संघात जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर मतदारांना आपल्या बाजूने करून घेण्याचा जोरदार प्रयत्न दोन्ही नेत्यांकडून होत आहे.

दरम्यान मागील निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचा २५ हजार मतांनी पराभव केला होता. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी धनंजय मुंडे यांनी कंबर कसल्याचं दिसत आहे.पंकजा मुंडे या सध्या राज्य मंत्रीमंडळात ग्रामविकास मंत्री म्हणून काम पाहत आहेत. मागील पाच वर्षात त्यांनी कोट्यावधींचा निधी खेचून आणला आहे. मात्र २०१६ मध्ये परळी नगरपालिका आणि २०१७ मध्ये पंचायत समिती निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांचा आत्मविश्वास वाढला आहे.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1179273327908720640?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1179267518910873602?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1179262906980012032?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!