Share

महाजनादेश यात्रेतील मेटें सोबतच्या वादावर पंकजा मुंडे म्हणाल्या…

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बीडच्या महाजनादेश यात्रेत मुंडे – मेटे वाद उघडकीस आला आहे. मात्र या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न पंकजा मुंडे यांनी केला आहे. पूरग्रस्तांचा आढावा घेण्यासाठी पंकजा मुंडे आज कोल्हापूर येथे आल्या होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.

बीडच्या यात्रेत मुंडे –  मेटे वाद चांगला गाजला. नेमक असं काय झाल होत असे पत्रकारांनी पंकजा मुंडे यांना विचारले. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, मेटे आणि माझ्यात वाद असण्याचा प्रश्नच नाही. आणि मुख्यमंत्र्यांबरोबर रथावर मी उपस्थित असण अपेक्षितच नव्हत असे सांगत पंकजा मुंडेंनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा बीड येथे आली होती. यावेळी रथातून मुख्यमंत्र्यांची भव्य रली काढण्यात आली. मात्र या रली वेळी मुख्यमंत्र्यांसोबत विनायक मेटे उपस्थित होते. तर पंकजा मुंडे यांनी रथावर जाण टाळल. त्या खालीच बसून राहिल्या. त्यामुळे विनायक मेटेंच्या उपस्थितीमुळेचं पंकजा मुंडे यांनी रथावर जाण टाळल असल्याचं बोललं जात आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!