टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार दिलीप सोपल हे 28 ऑगस्टला शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर पक्षप्रवेश होणार असल्याची घोषणा सोमवारी सोपल यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. तर आज आ दिलिप सोपल यांनी विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला आहे. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, आणि मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित होते.
दिलीप सोपल निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा गेले अनेक दिवस होती. मात्र आता सोपल यांचा पक्षप्रवेशाची तारीख फायनल झाली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून दिलीप सोपल यांना ओळखलं जातं. आघाडी सरकारमध्ये त्यांनी विविध मंत्रीपदांवर काम केले आहे. गेल्या महिनाभरापासून सोपल शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती.
दरम्यान आ. सोपल यांचा शिवसेना प्रवेश भाजपमध्ये असणारे माजी आ राजेंद्र राऊत यांच्यासाठी अडचणींचा ठरणार आहे. युतीच्या जागावाटपात बार्शी मतदारसंघ शिवसेनेकडे आहे, यामध्ये राऊत यांनी दोनवेळा शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेला असल्याने पक्षप्रमुख त्यांच्यावर नाराज आहेत. सोपल यांच्या प्रवेशामुळे राऊत यांचा वचपा काढण्याची आयती संधी शिवसेनेला मिळणार आहे.
- उपमुख्यमंत्री पदासंदर्भातला पेपर मी सध्या फोडणार नाही : आदित्य ठाकरे
- धनंजय मुंडेंची भाषण मोठमोठी पण ऐकायला काळंं कुत्रही नाही : देवेंद्र फडणवीस
- इंदापूरच्या जागेबाबत निर्णय घेऊ शकत नाही, मी केवळ पक्षाचा एक मावळा : खा. कोल्हे
- ‘सुळे निवडून आल्या तर इव्हीएम चांगलं आणि मुंडेंच्या मुली जिंकल्या तर मशीन खराब’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

