Share

पंकजा मुंडे आमच्या नेत्या, त्यांना भेटून मुंडे साहेबांची आठवण आली – कराड

Published On: 

नवी दिल्ली- भाजपच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या नाराज असल्याची चर्चा राज्यात सुरू आहे. एका बाजूला  मुंडे भगिनी नाराज असल्याची माध्यमांमध्ये चर्चा असताना दुसऱ्या बाजूला काल त्यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी काल दिल्लीत पंकजा मुंडे यांची भेट घेत त्यांच्याशी जवळपास तासभर चर्चा केली.

डॉ. कराड यांची (स्व.) गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख आहे. परंतु मुंडे भगिनींना डावलून वंजारी समाजातील डॉ. कराड यांना भाजप नेतृत्वाकडून पुढे आणले जात आहे, अशी चर्चा मुंडे समर्थकांमध्ये सुरू आहे. अशातच या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, या वेळी डॉ. कराड यांनी ‘गोपीनाथ मुंडे साहेब आमचे नेते होते, आता पंकजा मुंडे आमच्या नेत्या आहेत,’ अशा शब्दांत कराडांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी आज (१३ जुलै) मुंबईत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची एक बैठक बोलावली आहे. प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं समर्थक आक्रमक झालेत मुंडे भगिनींना भेटण्यासाठी ते परळीहून मुंबईत दाखल झालेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!