🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : जो पर्यंत बीड मधील सर्व उमेदवारांच्या डोक्याला गुलाल लागणार नाही, तो पर्यंत मी फेटा बांधणार नाही, असा निर्धार भाजप नेत्या आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे. आष्टी मतदार संघातील भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे यांच्या प्रचारसभेत बोलताना पंकजा मुंडे यांनी हा निर्धार केला आहे.
या विधानसभेला बीड जिल्ह्यात हायव्होल्टेज लढती पाहिला मिळणार आहेत. त्यामुळे महाआघाडीच्या आणि महायुतीच्या उमेदवारांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. याच अनुषंगाने बोलताना पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये भाजप युतीचेचं उमेदवार निवडून येणार असल्याचं विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही लक्ष्य केले.
यावेळी मुंडे म्हणाल्या की, मी महाराष्ट्रात प्रचार करुन माझा मतदारसंघ सांभाळते मला चिंता महाराष्ट्राची आहे. बीड जिल्ह्यात एकही बंडखोरी नाही. पाच वर्षांत पालकमंत्री असताना बीड जिल्ह्यात कारभार नाही तर संसार केला आहे. त्यामुळे मला कशाचीही भीती नाही.
विरोधक खोटा प्रचार करत आहेत. पंकजा मुंडे घाबरल्या अस म्हणत आहेत. त्यामुळेचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना बीडमध्ये याव लागत आहे, असे म्हंटले जात आहे. यावर पंकजा मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले. मोदी हे बीडमध्ये माझ्या प्रचारासाठी येणार नसून लोकसभेतील अभूतपूर्व यशानंतर शाबासकी देण्यासाठी येणार आहेत, असे मुंडे म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1183000908457598976?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182993044036964359?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182991005152239617?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
