🕒 1 min read
मुंबई: ओबीसी आरक्षणासंदर्भात (OBC Reservation) इम्पॅरिकल डेटावरून केंद्र आणि राज्यातली लढाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. यावरून राज्य सरकावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. यानंतर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मंगळवारी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
पंकजा म्हणाल्या की, आयोग स्थापन केले पण निधी दिला नाही. सातवेळा तारखा वाढवून मागितल्या. या सरकारला असुरक्षित करायचं आहे की काय, आरक्षण संपुष्टात आणायचं की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आंदोलनानंतर ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढून आरक्षणाला संरक्षण देण्याचं ढोंग घेतलं. या अध्यादेशाविरोधात लोक औरंगाबाद खंडपीठात गेले आहेत. ओबीसी आणि बहुजनांना अंधारात लोटणारा निर्णय या सरकारच्या काळात असल्याचे देखील पंकजा मुंडे म्हणाल्या.
पुढे पंकजा मुंडे म्हणाल्या की, आरक्षण मिळण्यासाठी इम्पिरिकल डेटावर काम झालं पाहिजे. आयोगाला निधी द्यावा, मंत्र्यांना पाठिशी घालण्यासाठी निधी आहे. पण आयोगासाठी निधी नाही हे दुर्दैव आहे. यावेळी निधी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. या आयोगाला पूर्वीच निधी दिला असता तर ही वेळ आली नसती, असे म्हणत त्यांनी खेद व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- तुमचं सिंहासन कोणामुळे हललं हे तुम्हाला माहीती आहे; केसरकरांचा पलटवार
- शरद पवार हे कधीच तोडगा काढणार नाहीत, खेळवत ठेवणं हे त्यांचं काम आहे- नारायण राणे
- ‘राज्य सरकार पाडण्यासाठी धक्के देत राहणार’, नारायण राणेंचा इशारा
- ‘शिवतीर्थ’वर सचिन तेंडुलकरने घेतली राज ठाकरेंची भेट
- विश्वासघातानं गेलेलं सरकार मेहनतीनं आणता येतं; चंद्रकांत पाटलांचा विश्वास


