मुंबई : एका कंपनीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांचा प्रतिकात्मक वापर करून जाहिरात केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ही जाहिरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून ज्या कंपनीची ही जाहिरात आहे, त्यांच्या कार्यालयात जाऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध करत तोडफोड केली आहे.
स्टोरीया फूड्स या कंपनीच्या ऑफिसमध्ये युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वात आंदोलन करून ही तोडफोड केली आहे. या कंपनीने एक जाहिरात बनवलेली, ज्यात काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य दाखवले गेले आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
त्याच्या निषेधार्थ आज भाई जगताप यांच्या आदेशानुसार मुंबई काँग्रेस सरचिटणीस नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेस व युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अंधेरी पूर्व येथील स्टोरीया फूड्सच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. यानंतर पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
काँग्रेसच्या या आंदोलनानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी खोचक टीका केली आहे. ‘आलू से सोनाच्या धर्तीवर… यहा से घास डालुंगा वहा से दूध निकलेगा, अशी जाहिरात केल्यामुळे खवळलेल्या काँग्रेसवाल्यानी कंपनीचे कार्यालय फोडले. संताप योग्यच आहे त्यांचा. कॉपीराईट वगैरे काही प्रकार आहे की नाही? पप्पू आणि पप्पूगिरीच्या पेटंटचे सर्व हक्क काँग्रेसकडे राखीव आहेत,’ असा घणाघात भातखळकर यांनी केला आहे.
https://twitter.com/BhatkhalkarA/status/1387001300693381126?s=20
कंपनीच्या तोडफोडीचं काँग्रेसकडून समर्थन !
भाई जगताप यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचे अभिनंदन केलं आहे. ‘आदरणीय सोनिया गांधी व आदरणीय राहुल गांधी यांची STORIA कंपनीने जाहिराती मधून केलेल्या बदनामीला चोख उत्तर दिल्याबद्दल मुंबई काँग्रेस सरचिटणीस नितीन सावंत तसेच युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन व कौतुक !! असले घाणेरडे धंदे खपवून घेतले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी!!,’ असा इशारा भाई जगताप यांनी ट्विटद्वारे दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्याच्या नाकर्तेपणाच्या धोरणामुळे रोज सरासरी २ लाख लसीकरण
- आधी रक्तदान करा आणि त्यानंतरच कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्या – विजय वडेट्टीवार
- ‘माझं काय व्हायचं ते होऊ द्या, मात्र मी घाबरून घरात बसलो तर या लोकांनी कोणाच्या दारात बसायचं ?’
- रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारी टोळी जेरबंद, जालन्यातून चोरी करायचे इंजेक्शन
- प्रवासी संख्या कमी असल्याने काही रेल्वे केल्या रद्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

