टीम महाराष्ट्र देशा : आयुष्यभर ज्यांनी अंगाखांद्यावर खेळवलं.. त्या चुलत्याला सत्तेच्या लालसेमुळे धनंजय मुंडे सोडून राष्ट्रवादीत गेलात. काय केले तिकडे जाऊन? तोडून फोडून पवार साहेबांनी बनवलेल्या राष्ट्रवादी पक्षाची त्यांच्याच पायगुणांनी काय अवस्ठा झाली आहे, हे आपण सगळे पाहत आहात, अशा शब्दांत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.
गोपीनाथ मुंडेंचे वय झाले.. गोपीनाथ मुंडेंला लबाडाचे ऑलंपिक द्या.. गोपीनाथ मुंडेंना संपवून टाका, अशी भाषणबाजी करुन गोपीनाथ मुंडेंना त्रास दिलेल्याना जनता विसरत नाही, असाही टोला यावेळी पंकजांनी लगावला. यावेळी खासदार डॉ. प्रीतम मुंडे, महादेव जानकर, माजी मंत्री आमदार सुरेश धस, रमेश अडसकर, रमेश पोकळे, अक्षय मुंदडा, यशश्री मुंडे यांच्यासह भाजपाचे अनेक नेते व्यासपीठावर उपस्थिती होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर परळी आयोजित जाहीर सभेत बोलत होत्या.
दरम्यान, गोपीनाथ मुंडेंच्या नावाचा विसरू पडू देणारे नाही. माझ्यातल्या गोपीनाथ मुंडेंचा अपमान होईल, असे वागणार नाही. मी गोपीनाथ मुंडे धारण केला आहे. माझ्यातली पंकजा मुंडे केव्हाच संपली आहे. मला मीडियाने विचारले की, धनंजय मुंडे हे गोपीनाथ गडावर दर्शनाला गेले. ज्यांनी प्रीतम मुंडेंनी गोपीनाथ मुंडे नाव लावले तर आरोप करता की नाव वापरून मतदान हडपण्याचा प्रयत्न करता म्हणून. आता तुम्ही काय करता..आज तुम्ही आठवण काढता.मला पत्रकारांनी विचारले जीवनात कशाचे जास्त दुःख झाले.. तेव्हा मी त्यांना सांगितले, मुंडे साहेबांच्या मृत्यूच्या दुःखापेक्षा भगवान गडावरील दसरा मेळावा विरोधामुळे दूर होणे, यापेक्षा माझ्यावर भ्रष्टाचाराचा पहिला आरोप झाला, तेव्हा जास्त दुःख झाले. कारण मुंडे साहेबांचा मृत्यू माझ्या हातात असता तर स्वतः चा जीव देऊन त्यांना वाचवले असते. अस पंकजा मुंडे म्हणाल्या.
मात्र, मला याचे वाईट वाटले. माझ्या मधल्या गोपीनाथ मुंडे या नावावर शिंतोडे उडवण्यासाठी भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. तेव्हा खूप वेदना झाल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. बचत गटाच्या महिलांच्या मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आले त्यांनी शाबासकी दिली. ‘सदा खूश रहो..’ हा आशीर्वाद दिला. मी तुमच्या विकासासाठी राजकरणात आहे. अस्तित्वासाठी एक जण लढतोय. धनंजय मुंडे चिडीचा डाव खेळतोय. मी निर्भीड आहे म्हणून मी राजकरणात टिकून आहे. मी कोणाला घाबरत नाही. कुठल्याच दडपणाला आणि ब्लॅकमेंलिंगला घाबरत नाही. मी खोटी आश्वासने देत नाही, असे देखील पंकजा मुंडे म्हणाल्या.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

