Share

अजित पवार यांचे ‘ते’ वक्तव्य दुर्दैवी, पंकजा मुंडेंचा घणाघात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्याच दिवशी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली.आज विधानसभेत बोलताना एक धक्कदायक भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. विदर्भ आणि मराठवाड्यातील वैधानिक विकास महामंडळाच्या मुद्द्यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना का केली नाही? ७२ दिवस होऊनही सरकार का काही करत नाही? असा सवाल उपस्थित केला होता.या प्रश्नांचे उत्तर देताना पवार यांनी सर्वांच्या भुवया उंचावणारी भूमिका घेतली.

उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तरे दिले. आम्ही विकास महामंडळ स्थापन करू, याबद्दल काही दुमत असल्याचे कारण नाही. बजेटमध्ये तसा निधीही देऊ मात्र जोपर्यंत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बारा आमदारांच्या पत्रावर सही करत नाहीत. तोपर्यंत विदर्भ-मराठवाडा विकास मंडळ तयार करणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिला.त्यांच्या या इशाऱ्यानंतर विधानसभेत विरोधकांनी गोंधळ घालत राज्यपाल आणि विदर्भ-मराठवाडा विकास मंडळ याचा संबंध काय? असा प्रश्न उपस्थित केला.

अजित पवार यांच्या या विधानाचा भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. अजितदादा पवार जर ऑन रेकोर्ड बोलले असतील तर हे खरच दुर्दैवी आहे. मराठवाड्याचा विकास आणि ते १२ आमदारांचा काय सबंध आहे ? असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला आहे.तर, मला नक्की कळत नाही राजकारणात हे लोक कोणत्या मानसिकतेत काम करत आहेत. असा घणाघात पंकजा मुंडे यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!