Share

शेतकऱ्यांच्या हितासाठी सिंचन कामे प्राधान्याने पूर्ण करणार-अब्दुल सत्तार

Published On: 

🕒 1 min read

सिल्लोड : ‘पाण्याशिवाय शेतीची आणि शेतकऱ्यांचा विकास नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्याचे सिंचन करावे तसेच उपलब्ध पाणी काटकसरीने वापरायला हवे. तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन पिके घेता यायला पाहिजे. यासाठी सिंचन कामे प्राधान्याने पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी रविवारी (दि.२८) पालोद येथे केले.

सोबतच तालुक्यातील जुने केटीवेअर व सिंचन प्रकल्पांची दुरुस्ती करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करा असे निर्देश अब्दुल सत्तार यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

रविवारी ( दि. २८) पालोद ता. सिल्लोड येथील खेळणा नदीवरील १ कोटी ४५ लाखांच्या कोल्हापुरी बंधारा कामाचा शुभारंभ महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाला. यावेळी पालोद ग्रामपंचायतीच्या वतीने ना. अब्दुल सत्तार तसेच मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. खेळणा नदीवर उभारण्यात येणाऱ्या नवीन बंधाऱ्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार असल्याचे सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी जि.प. माजी उपाध्यक्ष केशव तायडे, जि.प. बांधकाम सभापती किशोर बलांडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, कृउबा समितीचे सभापती अर्जुन पा. गाढे, जलसंधारण अधिकारी राजधर दांडगे, आकाश जज्जमे, सहाय्यक अभियंता यु. के. गायकवाड आदिंची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!