Share

बीडच्या काँग्रेस नेत्यावर फसवणुकीचा गुन्हा, गायरानात अतिक्रमण भोवले

Published On: 

बीड : गायरानात अतिक्रमण करुन जिनिंग थाटणे काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड.सुरेश हात्ते यांच्या अंगलट आले. या प्रकरणी मंडळाधिकाऱ्याच्या तक्रारीवरुन हात्तेंवर गेवराई तालुक्यातील तलवाडा ठाण्यात गुन्हा नोंद झाला. मंडळाधिकारी राजेंद्र माने यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.

त्यात म्हटले आहे की, ॲड.सुरेश ज्ञानोबा हात्ते यांनी २००८ ते २७ फेब्रुवारी २०२१ या दरम्यान तलवाडा शिवारातील गट क्र.१२३७ मधील १० हेक्टर ३७ आर क्षेत्रापैकी तीन एकर जमिनीत अतिक्रमण केले. एवढेच नाही तर शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंग या संस्थेची अनधिकृतपणे इमारत उभारली. इमारतीच्या सहन जागेत पाच वजन काटे व संरक्षक भिंत बांधली. या प्रकरणी ॲड. हात्तेंवर गुन्हा नोंद झाला.

ॲड. सुरेश हात्ते यांनी २००८ पासून अतिक्रमण केल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे तालुक्याचे नेते म्हणून ते परिचित आहेत. शिवाय ग्रामपंचायतीवर त्यांचा एकहाती अंमल राहिलेला आहे. ते एकवेळा जिल्हा परिषदेचे सदस्यही होते. नुकत्याच झालेल्या ग्रा.पं. निवडणुकीत त्यांच्या वर्चस्वाला धक्का बसला. त्यानंतर लगेचच अतिक्रमण प्रकरणी गुन्हा नोंद झाल्याने ॲड. हात्ते यांच्या अडचणीत वाढ झाल्यात.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!