Share

पब, पार्टी गॅंगमुळे मुंबईत नाईट कर्फ्यू लावण्याची वेळ; शेलारांचा आदित्य ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सद्या लोकांच्या मनातील कोरोनाची भीती कमी झाली असली तरी संकट मात्र कायम आहे. राज्यातील आकडेवारी मधल्या काही दिलासादायक आकड्यांपेक्षा वाढत आहे. त्यामुळेच खबरदारी घेणं गरजेचं असून राज्यातील यंत्रणेला तसे आदेश देखील देण्यात आले आहे. दरम्यान मुंबईचे आयुक्त इकबाल सिंह चहल मुंबईकरांना यांनी इशारा दिला आहे.

कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास मुंबईत नाईट कर्फ्यू लावण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं आहे. परवा मुंबईतील दोन ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. यावेळी हजारो लोक हे मास्क न लावता क्लबमध्ये पाहण्यात आले होते. लोक असेच वागत राहिले तर मुंबईत नाईट कर्फ्यू लावण्यात येईल. याबाबत स्वतः आयुक्त्यांनी नाईट कर्फ्यू लावण्याची तंबीच अतिउत्साही मुंबईकरांना दिली आहे.

नागरिकांना 15 दिवसांचा वेळ दिला आहे. त्यांनी आपले वर्तन सुधारले नाही तर आम्हाला नाईलाजाने नाईट कर्फ्टू लागू करावा लागेल, असं म्हणत त्यांनी अल्टिमेटम दिला असून सुधारणा न दिसल्यास मुंबईमध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात येणार आहे. क्लब, पार्ट्या, बार यांच्यामुळे कोरोना वाढू शकतो. त्यामुळेच नाईट लाईफची संकल्पना मांडणाऱ्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर भाजप नेते व आमदार ऍड. आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे.

‘बार, पब मुळे कोरोना वाढला.. आता नशा उतरली..? पालिकेला नाईट कर्फ्यू लावायची वेळ आली. पब, पार्टी गँगने वेळ वाढवून मागितली होती…या गँगला आता जबाबदार धरणार का? मुख्यमंत्री आरोग्याचे आवाहन करतात..तर पब, पार्टी गँग अनधिकृतपणे धिंगाणा घालतात! ही गँग मुख्यमंत्र्यापेक्षा मोठी आहे का?’ असा घाणाघात त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!