जळगाव : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी काही दिवसांपूर्वीच भाजप पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंत्तर महाराष्ट्रात भाजपला त्यांनी धक्के देण्यास सुरुवात केली होती. शेकडो कार्यकर्त्यांनी खडसेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची वाट धरली होती.
तर, खडसेंपासून सुरुवात केली असून अनेक आमदार राष्ट्रवादीमध्ये येण्यास इच्छुक असल्याचं विधान मंत्री व राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलं होतं. आता भाजपला आणखी एक मोठा धक्का बसणार असल्याच्या चर्चांना जळगावात उधाण आलं आहे. भाजपला गळती सुरु झाली असून आता एका आमदाराने भाजप सोडण्याचे काही संकेत दिले आहेत.
भुसावळचे भाजप आमदार संजय सावकारे यांचा आज वाढदिवस आहे. दरवर्षी वाढदिवसाच्यानिमित्त वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देत असतात. पण, यंदा जाहिरात देण्यात आली आहे पण या जाहिरातींमधून भाजपचे नेते आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा फोटोच गायब आहे. महाजनांचा फोटोच प्रसिद्ध करण्यात आला नाही. त्यामुळे भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याचे काही सूचक पाऊले त्यांनी उचलले आहेत अशा चर्चा आहेत.
याचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे जाहिरातीमध्ये राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांचा फोटो असल्याने भाजप आमदार संजय सावकारे खडसे यांच्या पाठोपाठ हातात घड्याळ बांधून घरवापसी करणार का? याबद्दल उत्सुकता लागली आहे. यासंदर्भात न्यूज १८ लोकमतने वृत्त दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पवार साहेबांची निवड होणार हे समजताच भाजप नेत्यांच्या उरात धडकी भरली’
- रोहित शर्मा फिटनेस टेस्टमध्ये पास, लवकरच टीम सोबत खेळताना दिसेल
- २६/११ च्या दहशतवाद्याला संयुक्त राष्ट्राकडून खर्चासाठी दर महिना दीड लाख रुपये मंजूर !
- पब, पार्टी गॅंगमुळे मुंबईत नाईट कर्फ्यू लावण्याची वेळ; शेलारांचा आदित्य ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- दिल्ली काबीज करायला शेतकऱ्यांची कूच, अमृतसरहून ७०० ट्रॅक्टर – ट्रॉली दिल्लीकडे निघाले


