🕒 1 min read
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार युपीएचे नवे अध्यक्ष होणार असल्याची चर्चा गुरुवारी दिल्लीत रंगली होती. राहुल गांधी जबाबदारी घेण्यास तयार नसल्याने शरद पवार यांच्या नावाची चर्चा असून त्यांच्याकडे युपीएचं अध्यक्षपद सोपवलं जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. लवकरच शरद पवार युपीएचं अध्यक्षपद स्वीकारतील असा दावाही केला जात आहे.
मात्र या बातमीचं खंडन करत यामध्ये तथ्य नसल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ता महेश तपासे म्हणाले, यूपीएच्या प्रमुख पदावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची नियुक्ती होणार अशा आशियाच्या चुकीच्या बातम्या काल दिवसभर वृत्तवाहिन्यांवर झळकत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक गोष्ट स्पष्ट करु इच्छिते कि यूपीए मधील घटक पक्षांमध्ये अशा प्रकारचा कुठलाच प्रस्ताव नाही व कुठली चर्चा देखील झालेली नाही.
दरम्यान, काही काँग्रेस नेत्यांनी शरद पवार यांची पंतप्रधानपदाच्या निवडीसाठी शिफारस केल्याच्या देखील चर्चा रंगल्या होत्या. यानंतर महाराष्ट्रातील अनेक भाजप नेत्यांनी टीकास्त्र सोडलं तर महाविकास आघाडीतील नेत्यांनी समर्थनच केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शरद पवार यांची युपीएच्या अध्यक्षपदी म्हणजेच विरोधी पक्ष नेत्यापदी निवड होणार हे समजताच भाजप नेत्यांना धडकी भरल्याची टीका केली आहे.
‘UPA अध्यक्षपदी आ. पवार साहेबांची निवड होणार हे समजताच महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या उरात धडकी भरली असून, त्यांचे जुने आजार जागी झाले आहेत.हळूहळू त्यांची मानसिक स्थिती खालावलेली दिसेल.’ अशी बोचरी टीका अमोल मिटकरी यांनी ट्विटरद्वारे केली आहे.
UPA अध्यक्षपदी आ. पवार साहेबांची निवड होणार हे समजताच महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या उरात धडकी भरली असून, त्यांचे जुने आजार जागी झाले आहेत.हळूहळू त्यांची मानसिक स्थिती खालावलेली दिसेल.
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) December 10, 2020
जाणून-बुजून काही लोकांनी अशा प्रकारच्या खोट्या बातम्या मीडियामध्ये पेरल्या – राष्ट्रवादी काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असा संशय आहे की जाणून-बुजून काही लोकांनी अशा प्रकारच्या खोट्या बातम्या मीडियामध्ये पेरून केंद्र सरकारच्या चुकीच्या कृषी धोरणाच्या बाबत जो तीव्र शेतकरी आंदोलन आहे त्याच्यावरून जनतेचे लक्ष विचलित व्हावं असा काही प्रयत्न ह्या बाबतीत झाला आहे, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ता महेश तपासे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- शेतकरी आंदोलनामुळे हरियाणातील भाजप सरकार संकटात; राजकीय वादळाची शक्यता
- रोहित शर्मा फिटनेस टेस्टमध्ये पास, लवकरच टीम सोबत खेळताना दिसेल
- २६/११ च्या दहशतवाद्याला संयुक्त राष्ट्राकडून खर्चासाठी दर महिना दीड लाख रुपये मंजूर !
- पब, पार्टी गॅंगमुळे मुंबईत नाईट कर्फ्यू लावण्याची वेळ; शेलारांचा आदित्य ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- रोहित शर्मा फिटनेस टेस्टमध्ये पास, लवकरच टीम सोबत खेळताना दिसेल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

