Share

२६/११ च्या दहशतवाद्याला संयुक्त राष्ट्राकडून खर्चासाठी दर महिना दीड लाख रुपये मंजूर !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: २६/११ हल्ला म्हणजे २००८ च्या नोव्हेंबर मध्ये छत्तीपती शिवाजी टर्मिनस, ओबेरॉय ट्रायडन्स, ताज पॅलेस अँड टॉवर, ल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरिमन हाऊस ज्यूशियन कम्युनिटी सेंटर, मेट्रो सिनेमा आणि टाइम्स ऑफ इंडिया बिल्डिंग आणि सेंट झेविअर्स कॉलेजच्या मागे एका गल्लीमध्ये आठ हल्ले झाले होते. या हल्ल्याचा झकीऊर रेहमान लखवीने कट रचला होता. तर यामधील मुख्य आरोपी अजमल कसब हा देखील एक पाकिस्तानी दहशतवादी होता.

मुंबईत झालेल्या हल्ल्यांचा दहशतवादी हल्ल्याचा एक गट होता, जेव्हा मुंबईतील लष्कर-ए-तैयबा या पाकिस्तानात असलेल्या इस्लामिक दहशतवादी संघटनेच्या १० सदस्यांनी मुंबईत चार दिवस चाललेल्या १२ गोळ्या गोळ्या आणि बॉम्बस्फोट घडवून आणले. त्यात ११५ निष्पाप लोकांचा मृत्यू आणि किमान ३०८ निष्पाप जखमी झाले होते.

भारत पाकिस्तान वादामध्ये दहशदवादी हल्ले आणि या दहशतवादाला पाकिस्तानकडून आसरा दिला जातो. यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा होऊन देखील पाकिस्तानची कुरापत वेळोवेळी भारतीय सैन्याला सामोरे जावे लागते. यामध्ये चीन कडून देखील पाकिस्र्तानला पाठींबा दिला जातो. तर आता चक्क संयुक्त राष्ट्र कडून देखील पाकिस्तान सरकारने केलेल्या विनंतीनंतर लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी झकीऊर रेहमान लखवीला खर्चासाठी निधी मंजूर केला आहे.

२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या झकीऊर रेहमान लखवीला प्रती महिना खर्चासाठी दीड लाख रुपये देण्यास संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या समितीने मंजुरी दिली आहे. लखवी हा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा ऑपरेशन प्रमुखदेखील आहे. पाकिस्तान सरकारने केलेल्या विनंतीनंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या मंजूर समितीने हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, लखवीला देण्यात येणाऱ्या प्रती महिना दीड लाखांमध्ये जेवण (५० हजार), औषधं (४५ हजार), सार्वजनिक गोष्टींचा वापर (२० हजार), वकिलांची फी (२० हजार) आणि वाहतूक (१५ हजार) यांचा समावेश आहे.

मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर लखवीचा समावेश दहशतवाद्यांच्या यादीत करण्यात आला होता. २०१५ पासून तो जामीनावर बाहेर आहे. फक्त दाखवण्यापुरतं त्याला पाकिस्तानी जेमलध्ये ठेवण्यात आलं होतं. कारण रावळपिंडीमधील अदियाला जेलमध्ये असतानाही तो एका मुलाचा बाप झाला होता.

याशिवाय पाकिस्तानने अणुशास्त्रज्ञ मोहम्मद सुलतान बशीरुद्दीन यांनाही प्रतीमहिना पैसे देण्याची विनंती संयुक्त राष्ट्राने मान्य केली आहे. त्यांनाही महिना दीड लाख रुपये दिले जाणार आहेत. पाकिस्तानच्या अॅटोमिक एनर्जी कमिशनसाठी काम केलेल्या बशीरुद्दीन यांनी अफगाणिस्तानात लादेनची भेट घेतली होती. नवाज शरीफ सरकारने त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केलं होतं.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!