पुणे – राज्यात आज आणि उद्या आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा (Maharashtra Health Department Exam) घेतली जाणार होती. पण नेहमीप्रमाणे ऐनवेळी ही परीक्षा रद्द झाल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आली. आज आणि उद्या होणारी परीक्षा ही रद्द झाल्याची माहिती शुक्रवारी रात्री नऊ वाजता राज्याच्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
परीक्षांच्या आयोजनाच्या बाबत राज्य सरकारचा गोंधळ कायम असून त्यामुळे जवळपास आठ लाख विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचे समोर आले आहे. सरकारच्या भोंगळ कारभारामुळे परीक्षार्थी अतिशाय संतप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी माफी मागतो, अशी प्रतिक्रिया आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
या सर्व प्रकरणी आता विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. या निर्णयावर रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांची प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले, आरोग्य विभागांकडून घेण्यात येणारी 26 तारखेची परीक्षा रात्री दहा वाजता रद्द करून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विद्यार्थ्यांशी छळ केलेला हा प्रकार आहे. राज्यातील विद्यार्थी मिळेल त्या वाहनाने परीक्षेच्या ठिकाणी पोहोचले होते .काही विद्यार्थी प्रवासात होते. आपली पदरमोड करून परीक्षा देण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा रद्द करून आरोग्यमंत्री व राज्य सरकारने टोपी घालण्याचे काम केले आहे.
परीक्षेच्या केंद्रामध्ये होणारा गोंधळ व खाजगी संस्थेला परीक्षा घेण्याचे दिलेले काम हे सर्व संशयास्पद आहे. त्यामुळे हे सरकार परीक्षा घेण्यासाठी सपशेल अपयशी ठरलेला आहे. त्यामुळे आमची विनंती आहे सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत घेण्यात यावे व विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.
दरम्यान, भाजप नेते निलेश राणे यांनी देखील टोपे यांच्यावर तोफ डागली आहे. ते म्हणाले, ऐनवेळी परीक्षा रद्द करून मानसिक खच्चीकरण केलं जात आहे, महिन्यापासून तारीख दिली असताना शेवटच्या दिवशी रात्री १० ला कळवले परीक्षा रद्द. ६३० रू gst सह फी भरली विद्यार्थ्यांनी, लूट चालू केली आहे या सरकारने. गोरगरीब विद्यार्थ्याना वेठीस धरल जातंय. याची भरपाई कशी होणार व कोण देणार? असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गोरगरीब विद्यार्थ्याना वेठीस धरल जातंय; आरोग्य विभागातील परीक्षा रद्द झाल्यानंतर निलेश राणेंनी डागली तोफ
- ब्रेकिंग : अखेर मंदिरांची दारे उघडणार; मुख्यमंत्री ठाकरेंनी केली तारखेची घोषणा
- फलटण-सातारा-बेळगाव-बंगळुरू मार्गे महत्वाचा पुणे ते बंगळुरू हा नवा हरित महामार्ग – गडकरी
- सोमय्यांनी कोल्हापुरात यावं, पण कुठल्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य करु नये; मुश्रीफांची सोमय्यांना तंबी
- सोमय्यांबाबत पहिल्या दिवशी जे घडलं ते चुकीचं; खुद्द अजित पवार यांनी दिली कबुली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

