Share

पंढरपूरची निवडणूक जीवावर बेतली ;ड्युटीमुळे शिक्षकासह कुटुंबातील चौघांचा कोरोनाने मृत्यू

Published On: 

🕒 1 min read

पंढरपूर : देशात दररोज कोरोना रुग्णांची वाढती संख्या भीषण समस्या निर्माण करत आहे. यामध्ये आणखी समस्या निर्माण झाल्या आहेत त्या अपुऱ्या आरोग्य सेवांमुळे २०२० प्रमाणे याही वर्षी देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. किंबहुना मागच्या वर्षीच्या तुलनेत कोरोना हा गंभीररित्या वेगानं देशात पसरत आहे. दुसरीकडे देशात मागील काही दिवसांपासून निवडणुकीचे वारे वाहत होते. त्यामुळे देशात संसर्गाचा धोका वाढला आहे. अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत नुकतीच पार पडली आहे.

सांगोला तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून केवळ इलेक्शन ड्युटीला आलेल्या शिक्षकाला स्वतःसह कुटुंबातील आई, वडील व मावशीचे प्राण गमवावे लागले आहेत. पंढरपूर निवडणुकीसाठी सांगोला तालुक्यातील घेर्डी येथील प्रमोद माने हे शिक्षक मतदानाच्या ड्युटीला होते. येथून परत गेल्यावर त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यामुळे त्यांची पत्नी, मुलगा, आई, वडील व मावशी यांनाही कोरोनाची लागण झाली.

प्रमोद यांचेवर सांगोला येथे सुरुवातीला उपचार करण्यात आले. मात्र तब्येत खालावल्याने त्यांच्या डॉक्टर भावाने त्यांना मुंबई येथे हलवले. मात्र प्रयत्नांची शिकस्त करूनही प्रमोद माने यांचे निधन झाले. यानंतर त्यांचे वडील वसंतराव, आई शशिकला व मावशी जया घोरपडे यांचाही कोरोनाने मृत्यू झाला. सुदैवाने त्यांची पत्नी व मुलगा याने कोरोनावर मात केली असली तरी या निवडणुकीमुळे केवळ शासकीय ड्युटी करणाऱ्या प्रमोद माने यांचे कुटुंब उध्वस्त झाले आहे.

पंढरपूरची पोटनिवडणूक कोरोनाचे पीक वाढण्यासाठी अतिशय पोषक ठरली असून अनेकांना यामुळे प्राण गमवावा लागला आहे. जे या निवडणूक प्रक्रियेत सामील होते त्यांना याचा अधिक फटका बसला असून त्यांच्या संसर्गाने इतरांनाही आपले प्राण गमवावे लागत आहेत. एकट्या पंढरपूर शहरात मतदानानंतर २५९ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून ग्रामीण भागातील आकडे यात सामील नाहीत.

अशीच अत्यंत भयावह अवस्था मंगळवेढा येथे झाली असून आत्तापर्यंत ५० पेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाने शिकार बनवले आहे. ना हॉस्पिटलमध्ये बेड ना ऑक्सिजन ना रेमेडिसिवीर अशी अवस्था असताना अंत्यसंस्कारालाही ताटकळत थांबायची वेळ आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना निवडणूक आयोगाने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात निवडणूक जाहीर केली. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाबाबत सुरुवातीपासूनच आश्चर्य व्यक्त होत राहिलंय. अनेकांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर संतापही व्यक्त केला. या निवडणुकीनंतर दोन्ही तालुक्यात कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहे. निवडणुकीनंतर आता ही भीती सत्यात उतरले असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!