सोलापूर – राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी 17 एप्रिलला मतदान होणार असून 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
या निवडणुकीसाठी 23 मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होणार असून 30 मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर 3 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.राष्ट्रवादीकडून दिवंगत आमदार भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके किंवा भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांच्यापैकी एकाला उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता आहे.
दरम्यान,या पार्श्वभूमीवर पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीची बैठक रविवारी (दि. 21) आयोजित करण्यात आली होती.
यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय शिंदे, दीपकआबा साळुंखे-पाटील, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, पक्ष निरीक्षक सुरेश घुले, जिल्हाकार्याध्यक्ष उमेश पाटील, ‘विठ्ठल’चे चेअरमन भगीरथ भालके आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी अजित पवार म्हणाले, तुमच्या मनातीलच उमेदवार पक्षाकडून दिला जाईल. पक्षाने दिलेल्या उमेदवारास निवडून देण्याची जबाबदारी तुमची सर्वांची आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेतकरी संघटना यांनी उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी घेत विरोधकांचे डिपॉझिट जप्त करण्याची कामगिरी केली पाहिजे.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी ढगातून खाली पडलेत का? संजय राऊत कडाडले
- पवारांच्या ‘त्या’ मागणीला माजी पोलीस आयुक्तांनी दिलं उत्तर; म्हणाले…
- ‘दिल्लीतील बैठका म्हणजे १०० कोटीच्या हिस्सेदारांची चाललेली धावपळ’
- ‘…परंतु त्यांनी वनडे मालिकेत राहुलला आणखी एक संधी द्यायला हवी’ ; गौतम गंभीर
- मोठी बातमी : अनिल देशमुख यांच्याविरोधात तक्रार दाखल


