पंढरपूर : अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. भाजपच्या समाधान आवताडे यांनी मोठी आघाडी घेतली असून राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा पराभव झाला आहे. ३७१६ मतांच्या आघाडीने समाधान आवताडे यांचा विजय झाला आहे.
भारतनानांच्या निधनामुळे त्यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांच्यामागे सहानुभूती असल्याने त्याचा त्यांना मोठा फायदा होईल अशी शक्यता वर्तवली जात असली तरी समाधान आवताडे यांना पंढरपुरात परिचारक गटाचं मोठं समर्थन मिळाल्यामुळे भालके यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासारख्या दिग्गजांनी उमेदवारांच्या प्रचारासाठी जोर लावला होता.
मात्र, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला भाजपने पराभूत केल्यामुळे भाजप नेत्यांनी विखारी टीकास्त्र सोडलं आहे. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये भगीरथ भालके यांनी आघाडी घेतली होती. यानंतर समाधान आवताडे यांनी आपली आघाडी कायम राखल्याने त्यांचा विजय हा निश्चित झाला होता. दरम्यान, मोठी आघाडी घेतल्यानंतर समाधान आवताडे यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष केला असून जनतेचा महाविकास आघाडीवर रोष असल्यानेच आपला विजय झाल्याची टिपण्णी आवताडे यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! बंगालच्या निकालानंतर प्रशांत किशोर यांचा राजकारणाला जय महाराष्ट्र!
- बंगालचे निकाल समोर येताच अमित शाहांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
- ‘जखमी वाघिणीचा ऐतिहासिक विजय!’, संजय राऊतांची बंगाल निकालावर प्रतिक्रिया
- ‘लोकांनी भाजपच्या गद्दारीला चपराक दिली’, बंगाल निकालावर गुलाबराव पाटलांची टीका
- ‘मोदी-शाह हे मोठे नेते, पण अजिंक्य नाहीत’, भाजपच्या पराभवावर राऊतांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

