Share

कांगारूंना लोळवून ‘पालघर एक्सप्रेस’ शार्दुल ठाकूरचे माहिम गावात जंगी स्वागत

Published On: 

🕒 1 min read

पालघर : ब्रिस्बेन कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. 328 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने सात विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडिया मायदेशी परतलेली आहे.

मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याचा पराक्रम गाजवला.या विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. 328 धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने सात विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले.

टीम इंडियाचा वेगवाग गोलंदाज शार्दुल ठाकूरचं पालघरमधील माहिममध्ये राहत्या घरी जोरदार स्वागत करण्यात आलं. माहिम गावातील रहिवाशांनीही शार्दुलचं टाळया वाजवून जंगी स्वागत केलं. यावेळेस शार्दुलला त्याच्या आईने ओवाळलं. आपल्या मुलाने देशासाठी मोठी कामगिरी केल्याने त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते.

ऑस्ट्रेलियावर शानदार कसोटी मालिकेत विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया आज भारतात परतली. यावेळेस टीम इंडियाच्या खेळाडूंचं शानदार स्वागत करण्यात आलं. विमानतळावरुन शार्दुल आपल्या पालघरसाठी निघाला. आपल्या सुपूत्राचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण पालघरमधील नागिरकांनी शार्दुलच्या घराबाहेर एकच गर्दी केली. घरी परतल्यानंतर शार्दुलच्या आईनी त्याचे ओक्षण केलं. यावेळेस त्याना अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले. यानंतर शार्दुलने केक कापून गावकऱ्यांसह या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा केला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!