मुंबई : इंडियन प्रिमीअर लीग ही क्रिकेट जगतातील सर्वात लोकप्रिय स्पर्धा आहे. या स्पर्धेत जगभरातील अनेक दिग्गज खेळाडू खेळत असतात. आयपीएल हे जागतीक क्रिकेटमध्ये एक मोठे व्यासपीठ म्हणून ओळखले जात आहे. मात्र पाकिस्तानच्या खेळाडूंना या स्पर्धेत खेळण्याची परवानगी मिळत नाही.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर सध्या इंग्लंडचे नागरिकत्व मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. या पार्श्वभूमिवर मोहम्मद आमीर हा आयपीएलमध्ये खेळणार अशा चर्चा सुरु आहे. याबद्दल मोहम्मद आमीरने स्वत: पुढे येत आयपीएल स्पर्धेबाबतच्या सर्व वृत्ताचे खंडण केले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत बोलताना आमीर म्हणाला की,’मी आयपीएलमध्ये खेळणार ही चर्चा का सुरु आहे मलाच समजत नाहीये. मुळात मी पाकिस्तान वगळता इतर कोणत्याही देशाचे प्रतिनिधीत्व करणार नाही’ असे स्पष्ट करत आयपीएल खेळण्याविषयीच्या सर्व चर्चांना पुर्णविराम लावला. मोहम्मद आमिरची पत्नी ही ब्रिटिश नागरिक आहे आणि त्यामुळे तो ब्रिटिश नागरिकत्व मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील राजकीय संबधामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंना आयपीएल मध्ये प्रवेश नाहीये. आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामात पाकिस्तानी खेळाडूनी सहभाग नोंदवीला होता. मात्र त्यांनतर मुंबई येथे झालेल्या २००८ साली पाकिस्तानी दहशतवाद्याच्या हल्लानंतर दोन्ही देशातील संबध बिघडले. यानंतर दोन्ही देशात एकही द्विपक्षीय मालिका झालेली नाही. भारत पाकिस्तान हे दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धेतच एकमेकाविरोधात खेळत असतात.
महत्त्वाच्या बातम्या
- मलायकाला पुन्हा आई होण्याची इच्छा ; स्वतःच केला खुलासा
- चित्रपटात भूमिकेसाठी फोन केलेल्या दिग्दर्शकाला गागुंलीने दिले ‘असे’ उत्तर
- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये जडेजा असेल एक्स फॅक्टर ; इंग्लंडच्या ‘या’ दिग्गजाची भविष्यवाणी
- बांग्लादेशच्या तमीम इक्बालने मिळवले ‘या’ दिग्गजांच्या यादीत स्थान
- निलंबनासाठी वडील आणि मी जबाबदार ; पृथ्वी शॉने केला खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

