मेरठ: सध्या महाराष्ट्रात मुदत संपणार्या आणि लांबणीवर पडलेल्या 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजल आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 15 जानेवारीला मतदान होत आहे. परंतु, आता सरपंचपदाचे आरक्षण मतदानानंतर काढण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हाधिकार्यांना दिले आहे.
तर एकीकडे महाराष्ट्रात सरपंच निवडणूकांचे बिगुल वाजले असताना उत्तरप्रदेशातील एटा जिल्ह्यातील एका गावची सरपंच चक्क एक पाकिस्तानी महिला झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ३५ वर्षांपूर्वी महिलेचं गुदारू या गावात लग्न झाले होते. ती भारतात व्हिसावर राहत आहे. पाकिस्तानी नागरिक असल्याची तक्रार केल्यानंतर तिच्याकडे सरपंचपदाचा राजीनामा मागण्यात आला आहे. डीपीआरओने या प्रकरणात ग्रामसेवकाला संबंधित महिलेविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
बानो बेगम या मुळच्या पाकिस्तानच्या कराचीत राहणाऱ्या महिलेचे ३५ वर्षांपूर्वी गावातील अख्तर अलीसोबत तिचं लग्न झालं होतं. ती अद्याप लाँग टर्म व्हिसावर भारतात राहत असून, तिला मात्र भारतीय नागरिकत्व अजून मिळालेले नाही. २०१५ मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत ती सदस्यपदी निवडून आली होती. तर यावर्षी ९ जानेवारी २०२० रोजी सरपंच शहनाज बेगम यांचे निधन झाल्यानंतर बानो बेगम यांना सदस्यांनी प्रभारी सरपंच म्हणून निवडले.
सरपंच झाल्यानंतर कवैदान खाँ यांनी १० डिसेंबरला डीपीआरओ यांच्याकडे महिला पाकिस्तानी असल्याची तक्रार केली. पोलीस तपासात हा आरोप खरा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बानो बेगम यांना सरपंचपदाचा राजीनामा द्यावा लागला. महिला पाकिस्तानी असून, तिच्याकडे भारतातील मतदान ओळखपत्र, आधार कार्ड असल्याचे स्पष्ट झाले आहे. डीपीआरओंनी ग्रामसेवकांना महिलेविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- खुशखबर ! ‘थर्टी फर्स्ट’च्या सोयीसाठी मुंबई महापालिकेचा महत्वाचा निर्णय
- महेबूब शेख यांना नाहक बदनाम करण्याचे भाजपचे षडयंत्र – राष्ट्रवादी
- विरोधी पक्षाने फक्त तंबूत बसून निदर्शने करावीत; शेतकरी नेत्यांची टीका
- तृतीयपंथीयांच्या मनाचा मोठेपणा; साईबाबांच्या झोळीत टाकले 11 लाखांचे दान
- ‘हा’ खुल्यावर्गावर अन्याय; अनेकदा अपयशी झालेले अधिकारी प्रशासन कसं हाताळणार? आनंद दवेंची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
