टीम महाराष्ट्र देशा: वैद्यकीय प्रवेशास मराठा आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज विधानपरिषदेत आरक्षण लागू करण्याच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता मराठा समाजातील विद्यार्थांना वैद्यकीय प्रवेशातही आरक्षणाचा लाभ मिळू शकतो.
नोव्हेंबर 2018 मध्ये राज्य सरकारने शिक्षण आणि सरकारी नोकरीत मराठा समाजासाठी 16 टक्के आरक्षण लागू करणारं विधेयक मंजूर केलं होतं. मात्र विधेयकातील काही त्रुटींवर बोट ठेवत यावर्षीच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात मराठा आरक्षण लागू करण्यास उच्च आणि सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला होता. त्यानंतर मराठा विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलनं केली होती.
पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात निर्माण झालेला पेच दूर करण्यासाठी सरकारकडून अध्यादेश काढण्यात आला होता. या अध्यादेशाचे रुपांतर कायद्यात करण्यासाठीचे विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आले होते. दरम्यान, आता विधान परिषदेत देखील या विधेयकाला एकमताने मंजुरी देण्यात आली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

