Share

बासमती तांदुळासाठी पाकिस्तानला मिळाला मिळाला जीआयचा टॅग !

Published On: 

नवी दिल्ली: जीआय टॅग म्हणजे भौगोलिक निर्देशांक यामध्ये विशिष्ट प्रदेशाला एखाद्या विशिष्ट वस्तूच्या उत्पादनामुळे ओळखले जाणे होय. जसे की, महाराष्ट्रात सोलापूरची चादर, पुणेरी पगडी, कोल्हापूरी चप्पल, नागपूरची संत्री या उत्पादनांना जीआय टॅग मिळलेला आहे. आता पाकिस्तानला बासमती तांदळासाठी भौगोलिक निर्देशांक (जीआय) मिळाला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने १९९९ साली जिओग्राफिकल इंडिकेश्न ऑफ गुड्स रजिस्ट्रेशन अँड प्रोटेक्शन कायदा केला. हा कायदा १५ सप्टेंबर २००३ पासून अंमलात आला. या कायद्यानुसार वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या सदस्य राष्ट्रांना त्यांच्या राज्यांना शेतीउत्पादनापासून ते खाद्यपदार्थांपर्यंत तसेच कलाकुसरीच्या वस्तूंपासून ते एखाद्या विशिष्ट प्रदेशातील प्राण्यांनाही हा जीआय टॅग उपलब्ध आहे. देशात २००४ साली दार्जिलिंगच्या चहापासून जीआय टॅग देण्याची परंपरा सुरू झाली होती.

भारत आणि पाकिस्तानमध्ये बासमती तांदळाच्या नोंदणीवरून युरोपियन युनियनमध्ये वाद सुरू आहे. भारताने युरोपियन युनियनमध्ये बासमतीच्या तांदळाची नोंदणीसाठी प्रयत्न केला असताना पाकिस्तानने यापूर्वी विरोध केला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कोणत्याही उत्पादनाची नोंद करण्यासाठी त्या देशाकडे उत्पादनाचा जीआय असणे आवश्यक आहे. त्यामुळे भारताला बासमतीच्या उत्पादनाची जागतिक पातळीवर नोंदणी करणे शक्य झाले नाही. पाकिस्तानला जीआय टॅग मिळाल्याने पाकिस्तानचा युरोपियन युनियनमधील दावा हा आणखी बळकट होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!