🕒 1 min read
अहमदनगर :- कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी सरकारच्या आदेशानुसार १७ मार्चला शिर्डीचे श्री साईबाबा समाधी मंदिर साई भक्तांसाठी बंद करण्यात आले होते. तब्बल आठ महिन्यानंतर पाडव्याच्या मुहूर्तावर हे मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे.
राज्य सरकारच्या आदेशाने शिर्डीचे श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी १६ नोव्हेंबरला खुले करण्यात आले. तेव्हापासून म्हणजेच गेल्या ७१ दिवसात सुमारे १२ लाख २ हजार १६२ साईभक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतला. तर, याकाळात साईभक्तांकडून तब्बल ३२ कोटी २ हजार १९१ रुपये देणगी रोख स्वरूपात संस्थानला प्राप्त झालेली आहे. याशिवाय ७९६ ग्रॅम सोने व १२ हजार १९२ ग्रॅम चांदी संस्थानला देणगी स्वरुपात प्राप्त झालेली आहे.
साई संस्थानच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या भक्तनिवास सुविधेचा गेल्या ७१ दिवसांच्या कालावधीमध्ये जवळपास ३ लाख २० हजार ६३९ लाभ घेतला आहे. याशिवाय साई संस्थानच्या वतीने मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्यांना उदी देण्यात येते. ही उदी तब्बल १० लाख ३१ हजार साईभक्तांना मिळाली आहे, असे संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- दिल्लीतील स्फोटामागे इराणमधील दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय
- शेतकऱ्यांनी मागे हटू नये, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत – राहुल गांधी
- करिअर निवडताना वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या; अजित पवार यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
- भाजपाशीच संबंधित एका गटाने दिल्लीत गोंधळ घडवला; संजय राऊत यांचा गंभीर आरोप
- “जैव-सुरक्षेमुळे मानसिकतेवर परिणाम होत आहे”


