🕒 1 min read
मुंबई : पिस्तूल दाखवून ओव्हरटेक करणाऱ्या कथित शिवसैनिकांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.वाहतूक कोंडीमधून लवकर बाहेर पडावं यासाठी कार चालकांनी चक्क पिस्तूलचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे.ज्या गाडीतून हे पिस्तूलधारी तरुण फिरत आहेत त्या गाडीच्या मागील काचेवर सत्ताधारी शिवसेनेचा लोगोही पहायला मिळत आहे.
काही शिवसैनिकांनी वाहनांच्या रहदारीतून मार्ग काढण्यासाठी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पिस्तूल दाखवल्याचा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय. इम्तियाज जलील यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला आहे. यानंतर सत्तेत असलेल्या शिवसेनेवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे.
जलील यांनी हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं,हे महाराष्ट्रातील पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आहे. वाहनावरील लोगो हे सर्व सांगते. शुक्रवारी शिवसैनिक त्यांच्या गाडीसाठी मार्गक्रमण करत असताना रिव्हॉल्वर्सचे ब्रँडिंग करत होते. गृहमंत्री / पोलीस महानिरीक्षक या अधर्मची दखल घेऊ शकतात का! असे म्हटले आहे.
चालत्या गाडीतून पिस्तुल दाखवत दादागिरी, गुंडगिरी करणारे कोण? चारचाकी गाडीवर शिवसेनेचे स्टिकर, ही घटना पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील आहे. शिवसेनेच्या लोकांना दादागिरी करण्याचं लायसन्स आहे की काय महाराष्ट्र मध्ये ?? pic.twitter.com/UAJBbAzVTu
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 30, 2021
दरम्यान, भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांनी या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. “चालत्या गाडीतून पिस्तुल दाखवत दादागिरी, गुंडगिरी करणारे कोण? चारचाकी गाडीवर शिवसेनेचे स्टिकर, ही घटना पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील आहे. शिवसेनेच्या लोकांना दादागिरी करण्याचं लायसन्स आहे की काय महाराष्ट्रामध्ये?,” असं ट्विट निलेश यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ८७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच रद्द करण्यात आली रणजी ट्रॉफी स्पर्धा
- शेतकऱ्यांनी मागे हटू नये, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत – राहुल गांधी
- करिअर निवडताना वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या; अजित पवार यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
- भाजपाशीच संबंधित एका गटाने दिल्लीत गोंधळ घडवला; संजय राऊत यांचा गंभीर आरोप
- पिस्तूल दाखवून ओव्हरटेक करणाऱ्या कथित शिवसैनिकांचा व्हिडीओ व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

