🕒 1 min read
नांदेड : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात बँक गैरव्यवहार प्रकरणे पुढे येत आहेत या पार्श्वभूमीवर आरबीआय कडून भविष्यकालीन धोका लक्षात घेत काही खाजगी बँकावर कारवाई करायला सुरुवात केली आहे. तर आता नांदेड येथील शंकर नागरी सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणी धारवाड कर्नाटक येथून विशेष तपास पथकाने एका अटक केली होती. आता केनियातील दोन तर युगांडाच्या एकाला अटक करण्यात आली आहे. 14 कोटी 46 लाखांच्या बँक घोटाळा प्रकरणात बँक घोटाळा प्रकरणात या युवकाने एका महिलेच्या बँक खाते स्वतः वापरले आहे. केनियन युवकाला अटक झाल्यानंतर या गुन्ह्यातील अटक आरोपींची संख्या 5 झाली आहे. ज्यात दोन महिला आणि एक पुरुष आज पर्यंत पोलीस कोठडीत आहेत. एक आरोपी विधी संघर्षग्रत बालक आहे. तर हुबळी इथल्या एका तरुणीला याच प्रकरणात अटक केली आहे.
नांदेडमधील लाहोटी कॉम्प्लेक्समधील आयडीबीआय बँकेजवळ असलेल्या शंकर नागरी सहकारी बँकेचे 14 कोटी 46 लाख 5 हजार 347 रुपये रुपये संशयास्पदरित्या वळवण्यात आले होते. ही घटना 2 जानेवारी रोजी बँक व्यवस्थापनाला समजली. शंकर नागरी बँकेची शाखा नांदेड शहरातील आयडीबीआय बँकेजवळ आहे. बँक व्यवस्थापनाने पोलिसांकडे तक्रार करुन या प्रकरणी चौकशीची मागणी करण्यात आली. NEFT आणि RTGS द्वारे बँकेला चुना लावण्यात आला. पोलिसांकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. सायबर सेलकडून याघटनेची चौकशी करण्यात आली. नांदेड पोलिसांनी या सर्व आरोपींना गजाआड केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ८७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच रद्द करण्यात आली रणजी ट्रॉफी स्पर्धा
- शेतकऱ्यांनी मागे हटू नये, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत – राहुल गांधी
- करिअर निवडताना वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या; अजित पवार यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
- भाजपाशीच संबंधित एका गटाने दिल्लीत गोंधळ घडवला; संजय राऊत यांचा गंभीर आरोप
- पिस्तूल दाखवून ओव्हरटेक करणाऱ्या कथित शिवसैनिकांचा व्हिडीओ व्हायरल


