🕒 1 min read
नवी दिल्ली : करोना संसर्गामुळे गेल्यावर्षी ऑलिम्पिक एक वर्ष पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या वेळी जपान सरकार, संयोजन समिती आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने 23 जुलै ते 8 ऑगस्ट 2021 या नव्या तारखा निश्चित केल्या होत्या. गेल्या काही दिवसात प्रसारमाध्यमांनी ऑलिम्पिकच्या संयोजनाविषयी संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्या दिल्या होत्या.
याबाबत ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष बाख यांनी तातडीची बैठक बोलावून याविषयी स्पर्धेच्या आयोजनाबाबत सकारात्मक व्यक्त केली. स्पर्धेबाबत पसरवण्यात येत असलेल्या अफवांवर आमचा विश्वास नाही आणि त्याचा आमच्यावर काही परिणाम होणार नाही. सध्या स्पर्धा कशा पार पाडल्या जातील याचाच आम्ही विचार करत आहोत. स्पर्धा घेण्यावर आमचा भर आहे, स्पर्धा रद्द करण्यावर नाही, असे बाख यांनी स्पष्ट केले.
जपानमधील परिस्थिती गंभीर होत आहे हे खरे असले, तरी लगेच निर्णयापर्यंत येऊ नका. जरा धीर धरा, संयम बाळगा असे बाख यांनी सांगितले. आम्हाला जर स्पर्धा घेणे खरंच सुरक्षित वाटले नाही, तर आम्ही त्या घेणारही नाहीत. याबाबत आताच बोलणे योग्य नाही. संयम बाळगा, असे बाख सांगत आहेत. बाख यांनी या वेळी टोकियो स्पर्धेचे पहिले प्ले-बुक चेही प्रकाशन केले.
महत्वाच्या बातम्या
- दिल्लीतील स्फोटामागे इराणमधील दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय
- शेतकऱ्यांनी मागे हटू नये, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत – राहुल गांधी
- करिअर निवडताना वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या; अजित पवार यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
- भाजपाशीच संबंधित एका गटाने दिल्लीत गोंधळ घडवला; संजय राऊत यांचा गंभीर आरोप
- “जैव-सुरक्षेमुळे मानसिकतेवर परिणाम होत आहे”


