🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : ओडिसामध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार विजेत्या शेतकऱ्याची दयनीय अवस्था समोर आली. त्या शेतकऱ्याला जरी पद्मश्री पुरस्कार मिळाला असला तरी त्याला मुंग्यांची अंडी खाऊन जगण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सरकार फक्त पुरस्कार देऊन सन्मानित करते परंतु त्यांच्या भविष्याची अजिबात काळजी घेतली जात नसल्याचं वारंवार समोर आले आहे.
ओडिसामधील क्योंझर तालुक्यातील तालाबायीताराणी गावातील रहिवाशी असणाऱ्या दियातारी नायक यांना यंदाचा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. परंतु या पुरस्कारामुळे त्यांच्यासमोर रोजगाराची समस्या निर्माण झाली आहे. नायक यांच्या प्रतिष्ठेला रोजंदारीची कामे शोभत नाहीत, असं म्हणत त्यांना रोजगार नाकारत आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर अन्न पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून ते मुंग्यांची अंडी खाऊन जीवन जगत असल्याची माहिती आहे.

दरम्यान, २०१० ते २०१३ दरम्यान गोनासिका डोंगररांमधून नायक यांनी एकट्याने फावडे आणि पहारीच्या मदतीने तीन किलोमीटरचा कालवा खणून आपल्या गावात पाणी आणले आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे गावातील १०० एकर शेतजमिनीला पाणी मिळाले. याच कार्यासाठी त्यांना यंदा समाजसेवेतील योगदानासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
नायक हे ‘पद्मश्री’ पुरस्कार परत करणार आहेत. ‘मी आता नागिणीची पाने आणि आंबापोळ्या विकून संसारासाठी लागणारे पैसे मिळवत आहे. माझ्यासाठी या पुरस्काराची किंमत शून्य आहे. मी हा पुरस्कार परत केल्यास मला पुन्हा काम मिळू शकेल. म्हणूनच मला हा पुरस्कार परत करायचा आहे अस नायक यांनी सांगितलं.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

