नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) यांची काल पंजाबमधील फिरोजपूर येथे सभा सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आली. कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या पंतप्रधानांचा ताफा एका फ्लायओव्हरवर आंदोलकांमुळे सुमारे १५ ते २० मिनिटे अडकून पडला. जिथे हा ताफा अडकला तिथून पाकिस्तान फक्त १० किमी अंतरावर होतं त्यामुळे हा घटनाकर्म मोदींच्या हत्येचा कट होता. असा आरोपही भाजपने केला आहे. तर या घटनेनंतर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी गैरसोईबद्दल माफी मागितली आहे.
दरम्यान या घटनेनंतर पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांची भेट घेतली आहे. या भेटीत राष्ट्रपती कोविंद यांनी पंजाबमध्ये घडलेला घटनाक्रम जाणून घेतला. या घटनेत झालेल्या गैरसोईबद्दल राष्ट्रपतींनी चिंताही व्यक्त केली.
President Ram Nath Kovind met Prime Minister Narendra Modi at the Rashtrapati Bhavan today and received from him a first-hand account of the security breach in his convoy in Punjab yesterday. The President expressed his concerns about the serious lapse. pic.twitter.com/lzvAuriuGb
— President of India (@rashtrapatibhvn) January 6, 2022
दरम्यान गृहमंत्रालयाने पंजाब सरकारला याबाबत रिपोर्ट देण्याचा आदेश दिला आहे. तसेच या घटनेबाबत हायकोर्टातही शुक्रवारी याचिका दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान यावरूनच भाजपने मात्र हा काँग्रेस सरकारचा घातपात करण्याचा डाव असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- शरद पवारांच्या भेटीनंतर लॉकडाऊन बाबत आरोग्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
- दगडफेक प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात परळी कोर्टाकडून अटक वॉरंट जारी
- “जनतेवर भार टाकण्याआधी संवेदशीलतेने विचार करा”; सदाभाऊंचा टोला
- पोर्नोग्राफी प्रकरणात अटक झाल्यानंतर राज कुंद्रासोबत शिल्पा शेट्टीने शेअर केली पहिली पोस्ट
- अमृता फडणवीस यांचे नवे ट्वीट चर्चेत; योगा करतानाचा फोटो पोस्ट करत म्हणाल्या..

