🕒 1 min read
सांगली : सांगलीतील पूरग्रस्त भागाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान सांगलीतील हरभट रोडवर शिवसेना आणि भाजपाचे पदाधिकारी आमनेसामने आले. निवेदन देण्यावरून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यामुळे या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही कार्यकर्त्यांना दूर करत शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या गोंधळात मुख्यमंत्री ठाकरे निवेदन न स्विकारताच पुढे निघून गेले.
मात्र, या प्रकारावरून भाजपने मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका सुरू केली आहे. ‘दोन तासांपासून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही वाट बघत होतो. पण आमचं निवेदन न स्वीकारताच मुख्यमंत्री निघून गेले’, असे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री हे भाजप कार्यकर्त्यांना भिऊन पळून गेले असा आरोप करण्यात येत आहे. परंतू नेमके काय घडले हे तुम्ही खाली असलेल्या व्हिडिओमधून पाहू शकता.
#WATCH | Maharashtra: A clash breaks out between Police & BJP workers in Sangli. Traders & BJP workers tried to stop CM Thackeray's convoy at Harbat Road to make a statement to him following which the clash took place.
The CM is visiting the flood-affected areas of Sangli today. pic.twitter.com/nHzZmxtd0R
— ANI (@ANI) August 2, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आयर्विन पुलावरून कृष्णा नदीची पाहणी करून पेठेत आले. तेथे व्यापाऱ्यांसह भाजपचे काही लोक आणि विविध संघटना निवेदन देणार होते. पोलिसांनी दहा ते पंधरा संघटनांच्या प्रत्येकी पाच पाच प्रतिनिधींना निवेदन देण्यासाठीची मुभा दिली होती, त्यानुसार लोक जमले होते. मुख्यमंत्री गाडीतून उतरल्यानंतर प्रचंड गर्दी झाली आणि या गर्दीत गोंधळ वाढू नये यासाठी सुरक्षा रक्षकांनी गराडा घातला. त्याच वेळी गोंधळाला सुरुवात झाली. भाजपने घोषणा द्यायला सुरुवात केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेने ही घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे निवेदन न स्वीकारताच पुन्हा गाडीत बसले. त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘थप्पड मारण्याची वल्गना करणारा वाघ ३०-४० लोकांना पाहून भीतीने गाडीत लपून बसला!’
- ‘राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी मोदींची परवानगी घ्यावी लागेल’, चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य
- ‘लांब फेकणारा खेळाडू टोकियोला गेला नाही, त्यामुळे भारताने गोल्डन संधी गमावली’, काँग्रेसचा टोला
- ‘शब्दांचे खेळ, भावनिक आवाहन, ड्रायव्हिंगशिवाय येतंय काय? मग शरद पवारांनी कौतूक केले कशाचे?’
- बीसीसीआयचा पीसीबीला असाही झटका, पाकविरुद्धची मालिका सोडून खेळाडू खेळणार आयपीएल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

