Share

‘थप्पड मारण्याची वल्गना करणारा वाघ ३०-४० लोकांना पाहून भीतीने गाडीत लपून बसला!’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सांगलीतील पूरग्रस्त भागाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान सांगलीतील हरभट रोडवर शिवसेना आणि भाजपाचे पदाधिकारी आमनेसामने आले. निवेदन देण्यावरून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यामुळे या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही कार्यकर्त्यांना दूर करत शांत करण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्र्यांचा ताफा या भागात आल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले. ‘दोन तासांपासून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही वाट बघत होतो. पण आमचं निवेदन न स्वीकारताच मुख्यमंत्री निघून गेले’, असा आरोप भाजपा कार्यकर्त्यांनी केला. दरम्यान, या प्रकरणावरून भाजप आमदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ‘थप्पड मारण्याची वल्गना करणारा वाघ ३०-४० लोकांना पाहून भीतीने गाडीत लपून बसला’ या शब्दांत राणे यांनी निशाणा साधला आहे.

‘हरभट रोड सांगली येथे निवेदन देण्यासाठी रोषात आलेली ३०-४० लोकांची गर्दी पाहून घाबरुन ५ मिनिटात गाडीत लपून बसलेले मुख्यमंत्री म्हणे काल थप्पड मारण्याची वल्गना करत होते. वाघ_म्हणे…’ असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शनिवारी शिवसेना भवन फोडण्याची धमकी दिली होती. शिवसेना भवन फोडण्याच्या विधानाचा मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. ‘आपलं सरकार ट्रिपल सिट सरकार आहे. मी मुद्दामहून हे बोलत आहे. टीका ऐकायची खूप सवय झाली आहे, आता कौतुक झालं की भीती वाटते. चित्रपटातील डायलॉगप्रमाणे थप्पडसे डर नही लगता साहब, प्यार से लगता है. अशा या थापडा घेतल्या आणि दिल्या आहेत. जितक्या घेतल्या तितक्या दाम दुपटीने दिल्या सुद्धा आहेत. पुढे सुद्धा देऊ, त्यामुळे आम्हाला कोणी थापड देण्याचं बोलू नये. अशी एक थापड देऊ की पुन्हा कधी उठणार नाही. हा शिवसैनिकाच्या रक्तातील गुण आहे, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!