मुंबई : मुंबई विमानतळाच्या नावावरून सध्या महाराष्ट्रात नवा वादंग निर्माण झाला आहे. विमानतळाच्या व्यवस्थापनाचा ताबा अदानी यांच्या कंपनीकडे गेल्यामुळे त्याठिकाणी अदानी एअरपोर्ट्स असे नावाचे बोर्ड लावण्यात आले होते. हे सर्व बोर्ड्स आज शिवसैनिक आणि भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी फोडले. या प्रकारामुळे राज्यातील शिवसैनिक आणि सामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. विमानतळाला छत्रपती शिवरायांचे नाव अपेक्षित असताना अदानींच्या नावाचा बोर्ड लावल्याने तीव्र संताप व्यक्त होत होता. पण शिवसेना स्टाईलने बोर्डची तोडफोड केल्याने हीच खरी बाळासाहेबांची शिवसेना अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाचा ताबा १३ जुलैला अदानींकडे देण्यात आला आहे. यानंतर मुंबई विमानतळावर आणि बाहेर दोन्ही ठिकाणी अदानी विमानतळ असे नामफलक लावण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे असणाऱ्या विमानतळावर अदानींच्या नावे नामफलक लावण्यात आल्याने शिवसेनेकडून नाराजी जाहीर करण्यात आली होती.
अदानी उद्योग समूहाने मुंबई विमानतळाला ‘अदानी एअरपोर्ट्स’ असं नाव लावलं होतं. या संदर्भात अनेक तक्रारी शिवसैनिकांकडे आल्या. त्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी आणि भारतीय कामगार सेनेने विमानतळाला लावलेले अदानी एअरपोर्ट्सचे नाव फोडून टाकले. मुंबईचे विमानतळ जीव्हीके समूहाकडे होते. परंतु, जीव्हीके समूह आर्थिक संकटात आल्याने हे विमानतळ अदानी समूहाने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्णपणे अदानी समूहाच्या ताब्यात गेले आहे. मुंबई विमानतळाचा ताबा मिळताच विमानतळावर व बाहेर अदानी विमानतळ असे नामफलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी आज व्हीआयपी गेट नंबर ८ आणि विलेपार्ले हायवेवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरील बोर्ड लाठ्यांनी तोडला. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. मात्र तिथे अदानी विमानतळ असे लावलेले बोर्ड अजिबात सहन केले जाणार नाहीत, असं शिवसैनिकांचं मत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- भाजप कार्यकर्त्यांना पाहून सांगलीत मुख्यमंत्री ठाकरेंनी पळ काढला? पाहा हा व्हिडिओ..
- ‘थप्पड मारण्याची वल्गना करणारा वाघ ३०-४० लोकांना पाहून भीतीने गाडीत लपून बसला!’
- ‘राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी मोदींची परवानगी घ्यावी लागेल’, चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य
- ‘लांब फेकणारा खेळाडू टोकियोला गेला नाही, त्यामुळे भारताने गोल्डन संधी गमावली’, काँग्रेसचा टोला
- ‘शब्दांचे खेळ, भावनिक आवाहन, ड्रायव्हिंगशिवाय येतंय काय? मग शरद पवारांनी कौतूक केले कशाचे?’


