नवी दिल्ली : काँग्रेसचे सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे आज रविवारी निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु होते. अवघ्या ४६ व्या वर्षी राजीव सातव यांनी अखेरचा श्वास घेतला. राजीव सातव यांना गांधी कुटुंबीयांच्या जवळील मानलं जातं होतं. राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांचे विश्वासू म्हणून राजीव सातव यांना ओळखलं जायचं. राजीव सातव हे राहुल गांधी यांच्या किचन कॅबिनेटचे सदस्य मानले जातात.
त्यांच्या निधनानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. ‘मी माझ्या मित्राला गमावले. राजीव सातव यांच्या निधनामुळे मी फार दु:खी आहे. ते कॉंग्रेसच्या आदर्शांना प्रत्यक्षात उतरवणारे एक नेते होते. त्यांच्याकडे प्रचंड क्षमता होती. त्यांचे जाणे हे आपल्या सर्वांसाठी फार मोठे नुकसान आहे. मी त्यांच्या कुटुंबियांप्रती संवदेना व्यक्त करतो,’ अशा भावना राहुल गांधींनी व्यक्त केल्यात.
I’m very sad at the loss of my friend Rajeev Satav. He was a leader with huge potential who embodied the ideals of the Congress.
It’s a big loss for us all. My condolences and love to his family. pic.twitter.com/mineA81UYJ
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 16, 2021
दरम्यान, उद्या सोमवारी सकाळी १० वाजता (१७ मे) हिंगोली येथे सातव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी दिली. राजीव सातव यांना १९ एप्रिलपासून अस्वस्थ वाटत होतं. कोविडची लक्षणं दिसत असल्यानं त्यांनी २१ एप्रिल रोजी कोरोना चाचणी केली होती. २२ एप्रिल रोजी चाचणी अहवाल समोर आल्यानंतर त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. अहवाल आल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ एप्रिल रोजी सातव यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
सुरुवातीला त्याची प्रकृती चांगली होती. मात्र, २५ एप्रिलनंतर प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात अर्थात आयसीयू वार्डात हलवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मुंबई हलवण्याची चर्चाही सुरू झाली होती. मात्र, त्यांच्या प्रकृतीत पुन्हा सुधारणा होऊ लागली होती. सातव यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र, त्यांना कोरोना उपचारादरम्यान सायटोमॅजिलो विषाणूचा संसर्ग झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सातव यांच्या निधनाने महाराष्ट्रासह मराठवाड्याचे मोठे नुकसान’
- ‘राजीव सातव हे भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते’
- ‘ज्यावेळी खरी गरज होती त्यावेळी ईश्वराने हात काढून घेतला’
- ‘राजीव तु हे काय केलेस, तुला श्रध्दांजली कोणत्या शब्दात वाहू ?’
- मोठी बातमी : कॉंग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

