उस्मानाबाद: कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून गंभीर रूग्णांना ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा भासत आहे.त्यामुळे जिल्ह्यातील सहकारीसह खासगी साखर कारखान्याकडील उपलब्ध सिलेंडर जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले होते. त्यामुळे जिल्ह्यात साखर कारखान्यांसह विविध कंपन्याकडून ४६ ऑक्सिजन टाक्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. संपूर्ण राज्य ऑक्सिजन तुटवड्याशी झुंजत असतानाच नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजन टँक गळतीची घटना घडली होती.त्यामध्ये २४ कोरोना रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला होता.
उस्मानाबादेत ऑक्सिजनचा तुटवडा भासत आसल्याने तातडीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उपजिल्हाधिकारी तथा ऑक्सिजन पथक प्रमुख शिरीष यादव यांनी संबंधित तहसिलदारांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. हावरगाव येथील डीडीएनकडून ७, भैरवनाथ शुगरकडून ११, रांजणी येथील नॅचरल शुगर कारखान्याकडील ४, अजय पोलमर्स अँड इंडस्ट्रीज वर्क्स २१ तर सारडा इंडस्ट्रीजकडून ३ असे एकूण ४६ ऑक्सिजन सिलेंडर ताब्यात घेण्यात आले आहेत. हे सिलेंडर कोविड सेंटरला पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णाचा ऑक्सिजन अभावी तसेच रेमडेसेविरचा तुटवड्यामुळे मृत्यु होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्याला आटकाव घालण्यासाठी अरोग्य व्यवस्था प्रत्न करत आहे त्यातच उस्मानाबादेत साखर कारखान्यांसह विविध कंपन्याकडून ४६ ऑक्सिजन टाक्या ताब्यात घेऊन संबधितावर कारवाई करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अंकिता लोखंडे पुन्हा चर्चेत ; चर्चेचा विषय ठरतोय ‘हा’ व्हिडीओ
- जयंत पाटील हे अनिल देशमुख यांच्या घराचे वॉचमन आहेत का? – निलेश राणे
- तापसीवरील ‘त्या’ ट्विटनंतर कंगना पु्न्हा ट्रोल
- फिट असूनही कोरोना होतो कसा ? नेटकऱ्यांच्या प्रश्नावर मिलिंद सोमणने दिले हे उत्तर
- ‘काँग्रेसमध्ये काम करणाऱ्यांची किंमत, निष्क्रिय नेत्यांची गरज नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

