Share

भाजपची विजयी घौडदौड रोखण्यासाठी ओवैसींची ममतादीदींना युतीसाठी साद!

Published On: 

कोलकाता : बिहार निवडणुका झाल्यानंतर आता भाजपने पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांकडे आपला मोर्चा वळवला आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी ‘मिशन पश्चिम बंगाल’ सुरु केलं असून नुकताच या राज्याचा दौरा देखील केला होता. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या कट्टर भाजप विरोधी असून गेली अनेक वर्षे भाजपला कडवी झुंज देत आहेत.

त्यामुळे भाजपला अजूनही पश्चिम बंगाल काबीज करता आला नसला तरी येत्या निवडणुकांसाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अशातच भाजपची काहीशी डोकेदुखी वाढण्याचे चित्र आता निर्माण होत आहे. याला कारण म्हणजे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम हा पक्ष.

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी कालपर्यंत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भिडण्याची भाषा करत होते, मात्र अचानक त्यांनी ममता दीदींसमोर युतीसाठी हात पुढे केला आहे. त्यामुळे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा निर्णय पश्चिम बंगालची सर्व राजकीय समीकरणं बदलू शकतो.

बिहारमध्ये पाच जागा जिंकून आत्मविश्वास दुणावलेल्या ओवेसींची नजर आता पश्चिम बंगालकडे वळली आहे. प्रत्येक राज्यातील विधानसभेत आमदार पाठवून ओवेसी आपला पक्ष मजबूत करताना दिसत आहेत. बिहारमध्ये एमआयएमने काँग्रेसला मोठा झटका दिला होता. त्यातच आता, भाजपला पराभूत करण्यासाठी आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत युती करण्याचा प्रस्ताव ओवेसींनी दिला आहे. ‘नवभारत टाइम्स’ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!