Share

आग प्रतिबंधक सुविधांसाठी २१७ कोटींची गरज- राजेश टोपे

Published On: 

अहमदनगर : ६ नोव्हें.रोजी अहमदनगर मधील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागून ११ रुग्णांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार या विभागात कोरोनाबाधित १७ रुग्ण उपचार घेत होते. या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नगरच्या जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेसंदर्भात आरोग्य विभागाची पाठराखण करत सार्वजनिक बांधकाम विभागावर जबाबदारी टाकली आहे.

यासंदर्भात बोलत असताना टोपे म्हणाले की,’आरोग्य विभागासाठी इमारत बांधताना केवळ निधी देण्यापुरती आरोग्य विभागाची जबाबदारी असते. इमारतीचे बांधकाम, तेथील सुविधा, आग प्रतिबंधक यंत्रणा याची सर्व जबाबदारी बांधकाम विभागाची असते. नगरमधील आग लागलेली चार मजली इमारत सन २०१७-१८ मध्ये उभारण्यात आली. तिच्या ‘इलेक्ट्रिक ऑडिट’साठी ७.५० लाख रुपयांचे, तर आग प्रतिबंधक सुविधांच्या खर्चासाठी २ कोटी ६० लाख रुपयांचे अंदाजपत्रक तांत्रिक मंजुरीसाठी बांधकाम विभागाकडे जून २०२१ मध्ये पाठवण्यात आले. अनेक वेळा पाठपुरावा करूनही त्याला मंजुरी मिळालेली नाही. दुपारी मुख्यमंत्र्यांसमवेत या विषयावर चर्चा झाली. राज्यातील सरकारी रुग्णालयांच्या सुमारे ५५० हून अधिक इमारतींमध्ये आग प्रतिबंधक सुविधा निर्माण करण्यासाठी २१७ कोटी रुपयांची आवश्यकता आहे, त्याला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने मंजुरी द्यावी,’ अशी मागणी करण्यात आल्याचेही टोपे म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत सरकारी रुग्णालयांच्या राज्यभर अनेक इमारती आहेत, या इमारतींमधील आग प्रतिबंधक सुविधांसाठी जिल्हास्तरावर एक आग प्रतिबंधक अधिकारी नियुक्त करावा, सर्व सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जावे, सर्व जिल्हा रुग्णालयांत सीसीटीव्ही स्क्रीिनग रूम उभारून अंतर्गत व्यवस्थेवर देखभाल ठेवली जावी इत्यादी मागण्या करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!