🕒 1 min read
मुंबई : वसंत स्मृती मुंबई येथे आयोजित महाराष्ट्र भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणी बैठक पार पडली. यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले. ओबीसी समाजाला संघटित करून अधिक सक्षम करणे हे भाजपचा अंतिम ध्येय आहे असे म्हटले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरू फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.
ते म्हणाले, राज्य सरकारने एम्पिरिकल डेटा मुद्दाम सादर केला नाही आणि ओबीसी समाजाची दिशाभूल केली. ओबीसी आरक्षण काढून घेणे हे राज्य सरकारचे षडयंत्र आहे आणि त्यामागे कारण आहे. ते कारण म्हणजे फेब्रुवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुका राज्य सरकारला या निवडणुका होईपर्यंत वेळ काढायची आहे.
मराठा आरक्षणासाठी ४ महिन्यात भाजपने एम्पिरिकल डेटा गोळा केला. तसेच तो डेटा सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मान्य केला. मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत देखील या प्रकरणाबद्दल फडणवीस यांनी संवाद साधला. भाजपने या राखीव जागांवरील निवडणुकीत केवळ ओबीसी समाजाला उमेदवारी देण्याचे ठरविले आहे. मग एखादा उमेदवार निवडून नाही आला तरी चालेल, पण यातून माघार भाजप घेणार नाही. ओबीसी राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही तोपर्यंत भाजपा स्वस्थ बसणार नाही असेही म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘देशमुखांचे वय झालेय, त्यांना आता लपाछपीचा खेळ झेपणार नाही’, अतुल भातखळरांचा टोला
- कोणीही विरोध केला तरी माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे हेच घेणार-संजय राठोड
- ‘पेगासस’साठी एवढा निधी आला कोठून? की त्यातही नवीन कांड आहे?; आव्हाडांचा सवाल
- राजकीय खळबळ! ‘पेगासस’च्या मदतीने ३०० प्रतिष्ठित नागरिकांवर केंद्राची हेरगिरी
- अनिल देशमुख यांच्या काटोलमधील घरांमधून इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
