Share

‘आमची मुंबई खूप छान’, मुंबईत आलो म्हणजे मराठी आलंच पाहिजे

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात खासकरून मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी आलंच पाहिजे हा मुद्दा अनेकदा राजकीय ठरला. महाराष्ट्रात राहायचं म्हणजे मराठी आलं पाहिजे हा मुद्दा बरेचदा समोर आला आहे. यातच आता मुंबई इंडियन्स आणि टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने देखील मुंबईत राहणाऱ्यांना मराठीतच बोललं पाहिजे असे सांगितले आहे.

नुकताच हार्दिकचा एका व्हिडीयो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीयोमध्ये हार्दिकने मी मराठी शिकलो असं पांड्याने सांगितलंय. या व्हिडीयोमध्ये हार्दिक पांड्या मराठीत म्हणतो, ‘काय म्हणताय, सगळं बरं का? आमची मुंबई खूप खूप छान, सगळं बरं आहे. मी मराठी शिकणार आता, बॉम्बेमध्ये कोई भी मिलना तो मराठीत गोष्टी करा आता, सगळं येतं मला.’ मराठी शिकवण्याच्या बाबतीत सूर्यकुमार आपला शिक्षक असल्याचंही हार्दिकने सांगितलंय. तर हार्दिकचा हा व्हिडीयो सोशल मिडियावर सर्वांना फारच आवडलाय.

दरम्यान, भारतीय संघाकडून गेली अनेक वर्ष माजी कर्णधार एमएस धोनीने फिनिशरची भूमिका पार पाडली होती. धोनीच्या निवृत्तीनंतर गेल्या वर्षांपासून भारतीय संघ फिनिशरच्या शोधात आहे. सध्या भारतीय संघ या तीन अष्टपैलू खेळाडूंमध्ये फिनिशर शोधत आहे.

हार्दिक पंड्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने मागील काही वर्षात सर्व क्रिकेट दिग्दज खेळाडूंकडून वाहवा मिळवली आहे. नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात हार्दिकने फिनिशर म्हणून उत्तम भूमिका पार पाडली. सर्व भारतीय क्रिकेट रसिक धोनीचा उत्तराधिकारी म्हणून पंड्याकडे बघत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!