Share

रोहित शर्मा फिटनेस टेस्टमध्ये पास, लवकरच टीम सोबत खेळताना दिसेल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बंगळुरु येथे एनसीएमध्ये अनुभवी सलामीवीर रोहित शर्मानं फिटनेस चाचणी पास केली आहे. रोहित शर्मा तंदुरुस्त झाल्यामुळे भारतीय संघाची चिंता मिटली आहे. एएनआयनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. शनिवारी, १२ तारखेला रोहित शर्मा ऑस्ट्रेलियासाठी रवाना होईल अशी शक्यता आहे. ऑस्ट्रेलियात रोहित १४ दिवसांच्या विलगीकरणात राहील.

ऑक्टोबर महिन्यात ‘आयपीएल’दरम्यान मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे रोहितला काही साखळी सामन्यांना मुकावे लागले. त्यामुळेच रोहितची ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली नाही. आता जवळपास एक महिना तंदुरुस्तीवर लक्ष दिल्यावर ‘एनसीए’चे प्रमुख राहुल द्रविड, फिजिओ आणि निवड समिती सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली रोहितची चाचणी झाली. ही फिटनेस चाचणी रोहित शर्मा पास झाला आहे.

१४ दिवसांच्या विलगीकरणामुळे रोहित शर्मा पहिल्या दोन कसोटी सामन्याला मुकणार आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यापासून रोहित शर्मा उपलब्ध असणार आहे. १७ डिसेंबरपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार असून भारतीय संघ पहिल्यांदाच परदेशात गुलाबी चेंडूवर सामना खेळणार आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा सामना संपल्यानंतर भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे.  पहिल्या कसोटी सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली ‘पॅटरनिटी’ लीव्हवर जाणार आहे.  त्यामुळे विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मावर आणि पुजारावर भारतीय संघाच्या फलंदाजी मदार असेल.  विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे संघाचं नेतृत्व करणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!