Share

‘आमचा मानव फक्त सुशांत’ ; पवित्र रिश्ता भाग दोनवर सुशांतचे चाहते नाराज

Published On: 

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरलेली ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अल्पावधीतच या मालिकेने लोकांच्या मनात जागा निर्माण केली होती. विशेष म्हणजे या मलिकेतील अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत यांनी केलेली अर्चना-मानवची जोडी चांगलीच चर्चेत होती. या दोघांना या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळाली होती.

नुकतेच ‘पवित्र रिश्ता २.०’ चे चित्रीकरण सुरू झाले आहे. आता येणाऱ्या नवीन पवित्र रिश्तामध्ये अभिनेत्री अभिज्ञा भावे देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर अंकिता लोखंडे आणि शाहीर शेख यांची ‘पवित्र रिश्ता २.०’ ची पहिली झलक समोर आली होती. या फोटोंमध्ये शाहीर आणि अंकिता लोखंडे सोबत ऊषा नाडकर्णी आणि रणदीप राय दिसत आहेत. त्यामुळे दुसऱ्या सिक्वलमध्ये देखील उषा नाडर्णींचा दमदार अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

मात्र, आता ट्विटरवर ‘पवित्र रिश्ता २.0’वर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. शाहीरला सुशांतच्या भूमिकेत पाहणे चाहत्यांना मान्य नाही. त्यामुळे सोशल मीडियावर ‘पवित्र रिश्ता २’वर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. सुशांतच्या अनेक चाहत्यांनी ट्वीट करत ‘आमचा मानव केवळ सुशांत’ असे म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!