🕒 1 min read
मुंबई : राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या आमदारांच्या यादी जवळपास निश्चित झाली असून राष्ट्रवादीत भाजपमधून दाखल झालेले एकनाथ खडसे यांचीही राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत वर्णी लागली आहे. पण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्या नावाला विरोध दर्शवला आहे.
दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, एकनाथ खडसे यांचं नाव राष्ट्रवादीकडून राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी पाठवण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नुकतीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि त्यांनी एकनाथ खडसे यांचा नावाला विरोध केला.
Met Hon Governor Shri Bhagat Singh Koshyari with an appeal to reject the nomination of Mr Eknath Khadse.https://t.co/e5HFxhQGDw pic.twitter.com/ai6qgsbq6i
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) October 31, 2020
खडसेंचं नाव यादीत येणे हे संतापजनक आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे. भ्रष्टाचारी नेत्याला पुन्हा एकदा राजकारणात आणले जात आहे. खडसे हे पुन्हा जर राजकारणात सक्रीय झाले तर भ्रष्टाचाराविरोधी लढ्याला काही अर्थ राहणार नाही, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, खडसेंनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलेला आहे. याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात दमानिया यांनी तक्रारदेखील दाखल केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- दुर्देवाने राज्य सरकार कुठल्याच विषयात गंभीर नाही – प्रविण दरेकर
- भारतीय रेल्वेच्या मालवाहतुकीत आणि उत्पन्नात सातत्याने होतेय भरघोस वाढ
- जाणून घ्या देशभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने का होतेय घट?
- शिल्पा शेट्टी बनवणार टिकटॉकला टक्कर देणारे नवे ऍप
- काँग्रेसला नाराजीचा मोठा धक्का ! ‘हा’ दिग्गज नेता स्थापन करणार नवा पक्ष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
