Share

पूर परिस्थितीच्या कठीण काळात राज्य सरकारला आमचे संपूर्ण सहकार्य असेल – फडणवीस

Published On: 

मुंबई – महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. कोल्हापूर, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यातील अनेक नद्या धोक्याच्या पातळी वरून वाहात आहेत. गावातील अनेक सखल भागात घरांमध्ये तसच बाजारपेठेत पाणी शिरलं असून, नदी पात्रा जवळ राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. चिपळूण,रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर आणि रायगड जिल्ह्यातील महाड मध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्यानं राष्ट्रीय आपत्ती दलाच पथक चीपळून मध्ये दाखल झाले आहे.

चिपळूणसह कोकणातील अनेक भागात पाऊस-पुराच्या स्थितीमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत असं विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन आणि इतरही माझे सहकारी या भागात दौरे करीत आहेत. पिण्याचे पाणी आणि तयार अन्नाची पाकिटे ही आताच्या घडीला तातडीची गरज असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

या स्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मी चर्चा करून पिण्याचे पाणी आणि अन्न पाकिटे याबाबत तातडीने लक्ष देण्याची विनंती केली. त्यांनी सरकार ते तत्काळ उपलब्ध करून देईल, असे सांगितले आहे. यात सरकारला आमचे संपूर्ण सहकार्य असेल, असेही फडणवीस यांनी सांगितले आहे. काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यात ज्यांचे प्राण गेले त्यांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही सारे या कुटुंबीयांसोबत आहोत. जखमींना लवकर बरे वाटावे, यासाठी प्रार्थना करतो असं फडणवीस यांनी म्हटले आहे.

राज्यात पावसाचा कहर

नाशिक जिल्ह्यातही इगतपुरी, घोटी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, निफाड परिसरात काल जोरदार पाऊस झाला. गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून गोदावरीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. नाशिक कसारा दरम्यान दरड कोसळली असून त्यामुळे रेल्वे वाहतूक थांबविण्यात आली आहे.

कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून, पाणी पात्राबाहेर पडल्यामुळे कोल्हापूर – गगनबावडा, मलकापूर ते रत्नागिरी हे प्रमुख राज्यमार्ग बंद झाले आहेत. तसंच अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील 77 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सातत्यानं पुराचा फटका बसलेल्या जिल्ह्यातील चिखली गावातील नागरिकांची सुरक्षित स्थळी धाव घेण्यासाठी धडपड सुरु आहे.

सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातील देवरुखकरवाडी इथं झालेल्या भूस्खलनात 5 घरांचं नुकसान झालं असून काल रात्री उशिरा 27 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. संततधार पाऊस, अंधार आणि जमीन खचण्याचा धोका यामुळे मदतकार्यात अडथळे येत होते. कोयना आणि कृष्णा नदीतील पाणी पातळी वाढली असून अनेक गावांना जोडणारे पूल पाण्याखाली जाऊन संपर्क तुटला आहे. दरड कोसळल्यानं जावळी तालुक्यातील केळघर घाटातील वाहतूक थांबली आहे. वाई तालुक्यातही पूल खचल्यानं दोन गावांचा संपर्क तुटला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!