🕒 1 min read
माणगाव – राज्यात सर्वदूर कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढलं आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गेल्या 24 ते 36 तासांत झालेल्या अतिवृष्टीमुळं रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर आणि ठाणे या पाच जिल्ह्यांना महापुराचा फटका बसला आहे.
राज्यातल्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अखंड कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळं अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात असल्यानं अनेक नद्या इशारा पातळी ओलांडून वाहत आहेत. अनेक घाटरस्त्यांवर दरडी कोसळण्याच्या घटनांमुळं, तसंच अनेक ठिकाणी भूस्खलानामुळं वाहतूक ठप्प झाली आहे.
पावसामुळे रेल्वेमार्ग पाण्याखाली गेल्यामुळं मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली असून, इगतपुरी रेल्वेस्थानकावर शेकडो प्रवासी अडकून पडले आहेत, तर कोकणातल्या अतिवृष्टीमुळं मुंबई गोवा महामार्ग बंद झाला आहे. दरम्यान, कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात महापूर आला असून चहूबाजूंनी पुराच्या पाण्याने वेढल्याने चिपळूणची अवस्था भीषण झाली आहे.
????महाड
पावसामुळे कोकणवासीयांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय, परंतु आजवर आलेल्या अनेक संकटातून बाहेर पडलेला कोकणी माणूस आजही धीराने ह्या संकटाला सामोरा जाईल!
ह्या नैसर्गिक संकटकाळात आम्ही तुमच्या सोबत आहोत.@girishdmahajan @niranjandtweets @ithakurprashant @BJP4Maharashtra pic.twitter.com/8UewGwqZjk— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) July 22, 2021
यानंतर पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर आणि माजी मंत्री, आमदार गिरीश महाजन तातडीने माणगावमध्ये दाखल झाले आहेत.बचाव दल आमच्यासोबत असून त्यांनी आम्हाला पुढे जाण्यास अटकाव केला आहे. सकाळपर्यंत पाणी ओसरल्यानंतर एनडीआरएफची टीम बोटीने पुढील प्रवास करेल. आम्ही सुद्धा एनडीआरएफ टीमसोबत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. येथे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण महाड आणि रायगडचा परिसर जलमय झाला आहे. यामुळे येथील नागरिकांना प्रचंड हालअपेष्टांना सामोरं जावं लागत आहे, असं दरेकर म्हणालेत.
पावसामुळे कोकणवासीयांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय, परंतु आजवर आलेल्या अनेक संकटातून बाहेर पडलेला कोकणी माणूस आजही धीराने ह्या संकटाला सामोरा जाईल. या नैसर्गिक संकटकाळात आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशा शब्दात दरेकरांनी पूरग्रस्तांना धीर दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- तिसर्या वनडेत धवनला इतिहास घडवण्याची संधी; ‘या’ महान खेळाडूंनाही पिछाडीवर टाकणार
- दुखापतीमुळे टीम इंडियाचा तिसरा खेळाडू इंग्लंड दौऱ्यातून बाहेर
- पुण्यात आज १८७ कोरोनाबाधितांना मिळाला डिस्चार्ज ; तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- ‘राज्य सरकारचा बेफिकिरपणा आणि ढिसाळ नियोजनामुळे कोकणामध्ये पूरस्थिती’
- अखेर रसिका आणि असिफ यांचा बहुचर्चित आंतरधर्मिय विवाह पडला पार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
